मंगेशला चित्रपटांची लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2016 03:27 PM2016-11-08T15:27:21+5:302016-11-11T16:23:02+5:30

प्रियंका  लोंढे   अभिनेता मंगेश देसाईने नेहमीच त्याच्या चतुरस्त्र अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आता पुन्हा एकदा ...

Mangesh films lottery | मंगेशला चित्रपटांची लॉटरी

मंगेशला चित्रपटांची लॉटरी

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">प्रियंका  लोंढे
 
अभिनेता मंगेश देसाईने नेहमीच त्याच्या चतुरस्त्र अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आता पुन्हा एकदा मंगेश त्याच्या नव्या चित्रपटांसाठी सज्ज झाला आहे. मंगेशकडे अनेक दर्जेदार चित्रपट असल्याचे समजतेय. एक अलबेला या चित्रपटाच्या यशानंतर त्याच्याकडे अनेक चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्स आल्याचे कळतेय. मातृ देओ भव, अभिनेत्री आणि बऱ्याच चित्रपटांचे प्रस्ताव सध्या मंगेशकडे आहेत. याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना मंगेशने सांगितले कि, एक अलबेला या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाल्यानंतर मला अनेक दिग्दर्शकांचे फोन आले. बऱ्याच चित्रपटांचे प्रस्ताव माझ्याकडे आहेत. परंतु सध्या मी मातृ देवो भव तसेच शंतनु तांबे यांचा अभिनेत्री आणि गिरिश मोहिते यांचा एक चित्रपट मी करीत आहे. या तीनही चित्रपटांच्या चित्रीकरणात मी आता व्यग्र आहे. प्रत्येक चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या मंगेशने एक अलबेला या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री विदया बालनसोबत स्क्रीन शेअर केली होती. विदयासारखी अभिनेत्री समोर असताना देखील मंगेशने त्याच्या अभिनयाची मोहोर उमटवून आपण कुठेही कमी नाही हेच पुन्हा एकदा दाखवून दिले होते. एक अलबेला हा चित्रपट अनेक इंटरनॅशनल चित्रपट महोत्सवांसाठी निवडण्यात आला होता. तसेच आता राजस्थान इन्फॉरमेशन फिल्म फेस्टीव्हल (रिफ) मध्ये देखील एक अलबेलाची निवड झाली आहे. या चित्रपटाच्या यशानंतर मंगेशच्या करिअरची घोडदौडही जोरात सुरु आहे. 

      

      

Web Title: Mangesh films lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.