‘मानिनी’ स्वप्निलचा फेव्हरेट सिनेमा

By Admin | Published: March 13, 2016 09:07 PM2016-03-13T21:07:17+5:302016-03-13T21:07:17+5:30

प्रत्येक कलाकारासाठी आपला सिनेमा हा जवळचाच असतो. कोणत्याही चित्रपटासाठी स्टार्स हे अपार मेहनत घेतात आणि त्यांचे काम पडद्यावर दिसून येते, परंतु एखादा तरी चित्रपट

'Manini' Swapnil's Favorite Cinema | ‘मानिनी’ स्वप्निलचा फेव्हरेट सिनेमा

‘मानिनी’ स्वप्निलचा फेव्हरेट सिनेमा

googlenewsNext

प्रत्येक कलाकारासाठी आपला सिनेमा हा जवळचाच असतो. कोणत्याही चित्रपटासाठी स्टार्स हे अपार मेहनत घेतात आणि त्यांचे काम पडद्यावर दिसून येते, परंतु एखादा तरी चित्रपट या कलाकारांच्या जवळचा असतो किंवा फेव्हरेट असतोच. दर्जेदार चित्रपटांमधून अभिनयाची चुणूक दाखविलेला अभिनेता स्वप्निल जोशी म्हणतोय, त्याला त्याचा ‘मानिनी’ हा चित्रपट फार आवडतो. नवरा-बायकोच्या नात्यातील बंध उलगडणारा हा चित्रपट स्वप्निलच्या जवळचा आहे, असे तो सांगतोय. एवढेच नाही, तर ‘गुलाम ए मुस्तफा’ हा हिंदी सिनेमादेखील त्याला आवडतो. नाना पाटेकर, शिवाजी साटम यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत स्वप्निलने या सिनेमात काम केले होते. आपल्या कारकिर्दीतील हे दोन सिनेमे स्वप्निल कधीच विसरणार नाही व त्याचे चाहतेदेखील पुन:पुन्हा हे सिनेमे पाहून, स्वप्निलचे वर्क नक्कीच अ‍ॅप्रिशिएट करतील, यात शंका नाही.

Web Title: 'Manini' Swapnil's Favorite Cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.