'द प्लेबॉय मि. सोहनी' लघुपटात एका माणसाची अनोखी प्रेमकहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 07:52 PM2018-10-24T19:52:34+5:302018-10-24T19:53:08+5:30

तारीक नावेद सिद्दीकी दिग्दर्शित 'द प्लेबॉय मि. सोहनी' लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

a man's unique love story in 'The playboy Mr. Sohni ' shortfilm | 'द प्लेबॉय मि. सोहनी' लघुपटात एका माणसाची अनोखी प्रेमकहाणी

'द प्लेबॉय मि. सोहनी' लघुपटात एका माणसाची अनोखी प्रेमकहाणी

googlenewsNext
ठळक मुद्दे'द प्लेबॉय मि. सोहनी' लघुपटात जॅकी श्रॉफ यांची मध्यवर्ती भूमिका

तारीक नावेद सिद्दीकी दिग्दर्शित 'द प्लेबॉय मि. सोहनी' लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मध्यवर्ती भूमिका असून या शॉर्टफिल्ममध्ये स्त्री-पुरुष यांच्यातील मनोवेधक नाते दाखविण्यात आले आहे. ती दोघेही सतत एकमेकांना आजमावण्याचा, एकमेकांच्या स्वभावाचे कोडे उलगडण्याचा प्रयत्न करत राहतात.
'द प्लेबॉय मि. सोहनी' ही फ्लॅशबॅकमधून उलगडणारी गोष्ट आहे. यात प्लेबॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका माणसाची अनोखी प्रेमकहाणी चित्रीत करण्यात आली आहे. स्त्री-पुरुष नाते हे त्या नात्यातील दोघांसाठीही सदैव एक गूढ, एक कोडेच राहते, मग काळ कोणताही असो. दोघांच्या जडणघडणीमध्ये प्रचंड तफावत आहे पण तरीही ती दोघे नेहमीच एकमेकांकडे आकर्षित होत राहतात, राहतील हे या कथेचे मध्यवर्ती सूत्र आहे. चित्रपटात जॅझ संगीतावर आधारित काही विलक्षण सांगितिक तुकड्यांचा वापर करण्यात आला आहे आणि लघुपटाच्या कथनामध्ये हे तुकडे पात्रांइतकीच महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
द रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स हा लघुपट या प्रकारासाठी महत्‍वपूर्ण मंच ठरला आहे. नव्या तसेच प्रस्थापित दिग्दर्शकांबरोबर आणि कथाकारांबरोबर काम करू इच्छिणारा हा मंच लघुपटांसाठीचा अस्सल आणि प्रभावशाली ऐवजाचा शोध घेत त्यांच्या स्त्रोतापर्यंत पोहोचतो. 
या लघुपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक तारीक नावेद सिद्धीकी म्हणाले की, द प्लेबॉय मि. सोहनी ही कथा प्रेक्षकांसमोर सादर करणे ही माझ्यासाठी थरारून टाकणारी गोष्ट आहे आणि आपला हा लघुपट रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सच्या मंचावरून सादर करत असल्याचा मला अभिमान
आहे. माझ्या मते लघुपटांच्या सादरीकरणासाठी हा एक अगदी योग्‍य मंच आहे आणि भारतातील लघुपट क्रांतीला तो ख-या अर्थाने चालना देत आहे. ते करत असलेल्या अफाट कामगिरीबद्दल मला त्यांचे आभार मानायचे आहेत. हा मंच युवा चित्रपटकर्मींना खऱ्या अर्थाने आपले कसब परिपूर्णतेने प्रदर्शित करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा देत आहे.  

Web Title: a man's unique love story in 'The playboy Mr. Sohni ' shortfilm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.