"xxx दळतंय कुत्रं पीठ खातंय", अभिजीत केळकरची खोचक पोस्ट, थेट 'Bigg Boss'लाच सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 09:42 AM2024-09-06T09:42:05+5:302024-09-06T09:44:37+5:30

मराठमोळा अभिनेता अभिजीत केळकरने पोस्ट करत थेट 'बिग बॉस'लाच सुनावलं. 

marathi actor Abhijit Kelkar post on Bigg Boss Marathi Season 5 rules | Nikki Tamboli | Jahnavi Killekar | "xxx दळतंय कुत्रं पीठ खातंय", अभिजीत केळकरची खोचक पोस्ट, थेट 'Bigg Boss'लाच सुनावलं

"xxx दळतंय कुत्रं पीठ खातंय", अभिजीत केळकरची खोचक पोस्ट, थेट 'Bigg Boss'लाच सुनावलं

Bigg Boss Marathi Season 5 : मनोरंजनाचा बॉस असलेल्या 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाची सगळीकडे जोरदार चर्चा होताना दिसतेय. घरातील वाद-विवाद, स्पर्धकांमधील तू तू मैं मैं तसेच 'बिग बॉस'ने दिलेले टास्क या कारणामुळे ते कायमच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येतात. यामध्ये निक्कीवर जास्त नाराजी व्यक्त करताना दिसतात. ऐवढचं नाही तर निक्कीकडे 'बिग बॉस' हे थोडं झुकलेलं असल्याचाही आरोप करण्यात येत आहे. 

आपल्या मनमानी कारभारामुळे निक्की नेहमीच टीकेची धनी होते. निक्की तांबोळीच्या खेळीवर नेटकरी कायमत नाराजी व्यक्त करताना दिसतात. दुसरीकडे 'बिग बॉस' मराठीचे माजी स्पर्धक आणि कलाकार मंडळी वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत. अशातच मराठमोळा अभिनेता अभिजीत केळकरने पोस्ट करत थेट 'बिग बॉस'लाच सुनावलं. 

अभिजीत केळकरने पोस्ट करत लिहलं, "Bigg Boss पडलाय प्रेमात आणि प्रेम असतं XXX… त्यामुळे 'आता' कुठल्याही नियमांचं उल्लंघन झालेलं त्याला दिसत नाही. घरातलं समान उचलून आपटलं, लाथ मारून पाडलं. शारीरिक हिंसा झाली तरी ‘आता’ त्याला कोणीच Unfair वाटत नाही… तो 'आता' स्वत:चाच इतिहास विसरलाय. 'आता' त्याला लागतो तो फक्त प्रेमाचा चहा". एवढचं नाही तर कॅप्शनमध्ये त्याने लिहलं, .".. xxx दळतंय कुत्रं पीठ खातंय". त्याच्या या पोस्टवर नेटकरीही विविध प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहेत. 



नेमकं काय घडलं ?

नुकतंच 'बिग बॉस'च्या घरात निक्की तांबोळी व जान्हवी किल्लेकर यांच्यात वादा पाहायला मिळाला. नॉमिनेट करताना सुरज चव्हाणने योग्य निकष न लावल्यामुळे निक्की ही दुखावली गेली होती. शिवाय घराच्या कॅप्टन असलेल्या वर्षा यांनी त्यावर काहीच बोलल्या नाही. त्यामुळे निक्कीने कुठलेही काम करणार नाही, असा पवित्रा घेतला. यावर मग निक्की घरात सहकार्य करत नसल्याचे पाहून सदस्यांनी तिला रेशन तसेच शिजणारे अन्न द्यायचे नाही, असा निर्णय घेतला.


जान्हवी घरातील सगळ्यांसाठी चहा बनवताना निक्कीसाठी चहा बनवणार नसल्याचं जाहीर केलं. तिच्या या निर्णयावर सगळेच खूश झाले. मात्र, तेवढ्यात 'बिग बॉस' निक्कीला विचारतात की, निक्की चहा हवाय का? निक्की म्हणते, 'हो बिग बॉस' त्यानंतर 'बिग बॉस' जान्हवीला म्हणतात की, जान्हवी एक कप चहा निक्की यांच्यासाठी वाढवाल का? हे ऐकून जान्हवी आश्चर्याने विचारते, "तुम्ही खरंच बोलताय?…नाही बिग बॉस नाही. पण जर तुमचा आदेश असेल तर करेन. फक्त तुमच्यासाठी करेन". पुढे 'बिग बॉस’ म्हणतात, "मग माझ्यासाठी वाढवाल". जान्हवी म्हणते, "ओके बिग बॉस फक्त तुमच्यासाठी करते". तेव्हा बिग बॉस म्हणतात, "मला चहा प्यावासा वाटतोय".
 

Web Title: marathi actor Abhijit Kelkar post on Bigg Boss Marathi Season 5 rules | Nikki Tamboli | Jahnavi Killekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.