अनिकेत विश्वासरावच्या बॅग्स विमानतळावरुन गायब, पोस्ट शेअर करत म्हणाल; '४ दिवसांपासून...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 12:05 PM2023-09-04T12:05:09+5:302023-09-04T12:08:36+5:30

सोशल मीडियावरुन त्याने राग व्यक्त केला आहे.

marathi actor Aniket Vishwasrao s check in bags missing from airport since 4 days | अनिकेत विश्वासरावच्या बॅग्स विमानतळावरुन गायब, पोस्ट शेअर करत म्हणाल; '४ दिवसांपासून...'

अनिकेत विश्वासरावच्या बॅग्स विमानतळावरुन गायब, पोस्ट शेअर करत म्हणाल; '४ दिवसांपासून...'

googlenewsNext

मराठी अभिनेताअनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao) सध्या प्रिया मराठेबरोबर नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. दरम्यान प्रयोगासाठीच प्रवास करत असताना अनिकेतच्या चेक-इन बॅग्स विमानतळावरून गायब झाल्या. ४ दिवसांपासून तो याचा पाठपुरावा करत आहे मात्र अद्याप त्याला बॅग्स मिळाल्या नाहीत. याचा राग आता त्याने सोशल मीडियावरुन व्यक्त केला आहे.

काय आहे अनिकेत विश्वासरावची पोस्ट ?

'माझे चेक-इन बॅगेज गेल्या ४ दिवसांपासून गायब आहे. यावर तुमच्या बाजूने एकच प्रतिसाद येत आहे तो म्हणजे खोटी आश्वासने आणि दिशाभूल. ४ दिवस झाले तरी तुम्ही माझ्या बॅगेचा काहीच मागोवाही काढू शकला नाही. माफीच्या फक्त एका ईमेलने माझी समस्या सुटणार नाही. अव्यावसायिक आणि प्रवाशांप्रती तुम्ही दाखवत असलेल्या असहानुभूतीमुळे मला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.'

ही पोस्ट पाहिल्यानंतर तुम्ही शक्य तितक्या लवकर काम कराल अशी मला आशा आहे. मी गेल्या २४ वर्षांपासून इंडस्ट्रीत अभिनेता आहे आणि मला असा अनुभव कधीच आलेला नाही. मी माझ्या नाटकाचे कॉस्च्युम सुद्धा बॅगेत घेऊन जात होतो, त्यामुळे माझ्या कामातही अडथळा आला आहे.'  भविष्यात अशा प्रकारचा सामना कोणालाही करावा लागू नये अशीही आशा करतो.

अनिकेत विश्वासराव सध्या 'अ परफेक्ट मर्डर' नाटकात काम करत आहे. सतीश राजवाडेंचं हे नाटक नाट्यरसिकांच्या पसंतीस पडलं आहे. अनिकेत विश्वासरावच्या या पोस्टवर आता विमान सेवा कंपनीकडून काय प्रतिक्रिया येते आणि अभिनेत्याला त्याच्या बॅग्स परत मिळतात का हे पाहणं महत्वाचं आहे. 

Web Title: marathi actor Aniket Vishwasrao s check in bags missing from airport since 4 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.