फायर हैं..फायर! भाऊ कदमने केलं 'पुष्पा'ला कॉपी; फोटोने लावली सोशल मीडियावर आग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 06:03 PM2022-01-28T18:03:02+5:302022-01-28T18:03:48+5:30

Bhau kadam: सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या भाऊ कदम यांनी फेसबुकवर त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते पुष्पाच्या स्टाइलमध्ये दिसत आहेत.

marathi actor bhau Kadam copied Pushpa photo viral on social media | फायर हैं..फायर! भाऊ कदमने केलं 'पुष्पा'ला कॉपी; फोटोने लावली सोशल मीडियावर आग

फायर हैं..फायर! भाऊ कदमने केलं 'पुष्पा'ला कॉपी; फोटोने लावली सोशल मीडियावर आग

googlenewsNext

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (allu arjun) आणि रश्मिका मंदाना (rashmika mandana) यांची मुख्य भूमिका असलेला 'पुष्पा' (pushpa) हा चित्रपट अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर गाजत असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या चित्रपटाती गाण्यांवर, डायलॉग्सवर रिल्स केले आहेत. यामध्येच आता लोकप्रिय अभिनेता भाऊ कदम (bhau kadam) याच्यामध्ये पुष्षाची क्रेझ दिसून आली.

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या भाऊ कदम यांनी फेसबुकवर त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते पुष्पाच्या स्टाइलमध्ये दिसत आहेत. अगदी गेटअपपासून ते पुष्पाच्या स्टाइलपर्यंत त्यांनी प्रत्येक गोष्ट फॉलो केली आहे. त्यामुळे सध्या भाऊंचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान गाजत आहे.

दरम्यान, भाऊंचा हा फोटो कोणत्यातरी स्किटमधील असणार अशी शक्यता काहींनी वर्तविली आहे. परंतु, पुष्पाला कॉपी करायचा मोह भाऊ कदमलाही आवरला नाही हे यावरुन दिसून येतं.
 

Web Title: marathi actor bhau Kadam copied Pushpa photo viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.