"माझ्या घरी कुणीच तुमची सेवा करत नव्हतं तरीही.."; केदार शिंदेंनी शेअर केला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 10:42 AM2024-07-03T10:42:22+5:302024-07-03T10:42:42+5:30

केदार शिंदेंनी स्वामी समर्थांसोबतचा खास फोटो शेअर करत त्यांना आलेला अनुभव शब्दबद्ध केलाय (kedar shinde, shree swami samartha)

marathi actor - director kedar shinde share experience with shree swami samartha | "माझ्या घरी कुणीच तुमची सेवा करत नव्हतं तरीही.."; केदार शिंदेंनी शेअर केला अनुभव

"माझ्या घरी कुणीच तुमची सेवा करत नव्हतं तरीही.."; केदार शिंदेंनी शेअर केला अनुभव

केदार शिंदे हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक.  केदार यांनी दिग्दर्शित केलेले अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी झालेत. गेल्याच वर्षी २०२३ ला आलेला 'बाईपण भारी देवा' सिनेमा चांगलाच यशस्वी झाला. 'सैराट'नंतर सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा म्हणून 'बाईपण भारी देवा' सिनेमाला ओळखलं जातंय. केदार शिंदे श्री स्वामी समर्थांचे परमभक्त आहेत. अशातच केदार यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली जी चर्चेत आहे.

केदार शिंदे आणि स्वामींमध्ये अनोखं नातं

केदार शिंदेंनी नुकतंच सोशल मीडियावर एक खास फोटो पोस्ट केलाय. या फोटोत त्यांच्या समोर स्वामी समर्थांची मूर्ती पाहायला मिळते. या फोटोखाली केदार शिंदे कॅप्शन लिहितात, "३ जुलै १९९७.. तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. खरतर माझ्या घरी कुणीच तुमची सेवा करत नव्हतं. अचानक एन्ट्री घेतलीत. आणि आजतागायत कायम पाठीशी उभे आहात. यश अपयश सगळं तुमच्या पायी वाहिलं. आजही हातून असंख्य चुका घडतात. त्याचा जाब तुम्ही विचारणार, या विचाराने सगळंच तुम्हाला सांगतो. एक अनोखं नातं निर्माण झालं आहे. आणि ते मरेपर्यंत असेल."

केदार शिंदेंचं वर्कफ्रंट

केदार शिंदे यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर  त्यांनी २०२३ मध्ये आलेला 'बाईपण भारी देवा' या सुपरहिट सिनेमाचं दिग्दर्शन केलं. या सिनेमाचं सर्वच स्तरांवर कौतुक झालं. केवळ महिलांनीच नव्हे तर पुरुषांनीही हा सिनेमा पाहायला थिएटरमध्ये गर्दी केली. केदार शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी 'आईपण भारी देवा' या आगामी सिनेमाची घोषणा केली. २०२५ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. केदार शिंदे सध्या कलर्स मराठी टिव्हीचे प्रोग्रामिंग हेड म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

Web Title: marathi actor - director kedar shinde share experience with shree swami samartha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.