'बलोच'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; 'या' दिवशी उलगडणार इतिहासाची पानं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 06:22 PM2022-05-01T18:22:46+5:302022-05-01T18:23:34+5:30
Baloch:पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांनी कथा या चित्रपटातून उलगडली जाणार आहे.
सीमेपार जाऊन शत्रूशी लढा दिलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणाऱ्या 'बलोच' (baloch) या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांनी कथा या चित्रपटातून उलगडली जाणार आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. त्यातच प्रवीण तरडे (pravin tarde) यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर करण्यात आली आहे.
काय आहे पोस्टरमध्ये?
प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे दिसत आहेत. या सर्वांमध्ये प्रवीण तरडे यांच्या चेहऱ्यावरील करारी भाव प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. सोबतच त्यांच्या डोळ्यात धगधगणारी आग अनेक भावना व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता 'बलोच'च्या निमित्ताने पुन्हा एकदा इतिहासातील आठवणींना उजाळा मिळणार आहे.
कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
१ मे महाराष्ट्र दिनाचं निमित्त साधत बलोच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, हा चित्रपट याचवर्षी प्रदर्शित होणार आहे. दसऱ्याचा शुभमुहूर्त साधत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा असलेल्या या चित्रपटात प्रवीण तरडे यांची प्रमुख भूमिका असून कथा, दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांचे आहे