जाळ न् धूर संगटच काढलाय राव !; 'टकाटक 2' साठी किरण माने यांची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 03:05 PM2022-08-25T15:05:43+5:302022-08-25T15:07:43+5:30

Kiran mane: किरण माने यांनी टकाटक २ मध्ये छोटेखानी भूमिका साकारली आहे. मात्र, ही भूमिका महत्त्वाची असल्याचं दिसून येतं.

marathi actor kiran mane share special post for stylish takatak 2 movie | जाळ न् धूर संगटच काढलाय राव !; 'टकाटक 2' साठी किरण माने यांची खास पोस्ट

जाळ न् धूर संगटच काढलाय राव !; 'टकाटक 2' साठी किरण माने यांची खास पोस्ट

googlenewsNext

किरण माने (kiran mane)  हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. अनेक गाजलेले चित्रपट, मालिका यांच्या माध्यमातून ते कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहिले. परंतु, गेल्या काही काळापासून ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत येत आहेत. अलिकडेच किरण माने यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'टकाटक 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्सवर सध्या यशस्वी घोडदौड करत असून या चित्रपटासाठी किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

"आमच्या 'टकाटक 2' नं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: जाळ न् धूर संगटच काढलाय राव ! कोटींची उड्डानं घ्यायला सुरूवात केलीय. अशा सुपरहिट्ट सिनेमात आपला महत्त्वाचा वाटा असनं हे तर भारीच हाय...पन त्यात भूमिका करताना तुकोबाराया मांडायची संधी चालून येनं हे नुस्तं भारी नाय तर नादखुळा,जबराट,भन्नाट हाय !! मानसाच्या जगन्यातली एकबी गोष्ट अशी नाय ज्याबद्दल तुकोबानं ल्हीलेलं नाय... मी कधीबी,कुठंबी,कसाबी चालताना जरासा गोंधळलो तरी अलगद कुठनंतरी तुकोबा बोट पकडतो...कानमंत्र देतो..वाट दावतो..गाठ सोडवतो. अगदी तस्संच ह्या सिनेमात आमच्या चंद्याला भानावर आनायलाबी तुकोबाच उपयोगी पडला ! या प्रसंगाला प्रेक्षक भावूक होतात, डोळे पुसतात ते पाहून लै समाधान वाटतं. दिग्दर्शक मिलिंद कवडेंनी माझ्यावर विश्वास ठेवून असे अनेक प्रसंग फुलवन्याचं स्वातंत्र्य मला दिलं, त्याबद्दल लै लै लै आभार", असं पोस्ट किरण माने यांनी लिहिली आहे.

किरण मानेंचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; फोटो होतोय तुफान व्हायरल

दरम्यान, किरण माने यांनी टकाटक २ मध्ये छोटेखानी भूमिका साकारली आहे. मात्र, ही भूमिका महत्त्वाची असल्याचं दिसून येतं. या चित्रपटात किरण माने यांच्यासह प्रथमेश परब भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर आदी कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत.
 

Web Title: marathi actor kiran mane share special post for stylish takatak 2 movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.