'माझ्या बाबतीत काहीही लिहून आलं की..' ; सोशल मीडियाविषयी कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 12:56 PM2024-02-23T12:56:57+5:302024-02-23T13:30:07+5:30

Kushal badrike: कुशल कायम सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांच्या चर्चेत रहात असतो. मात्र, यावेळी त्याने शेअर केलेली पोस्ट थोडी हटके आहे.

marathi actor Kushal Badrike's post about social media | 'माझ्या बाबतीत काहीही लिहून आलं की..' ; सोशल मीडियाविषयी कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

'माझ्या बाबतीत काहीही लिहून आलं की..' ; सोशल मीडियाविषयी कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, विनोदवीर म्हणजे कुशल बद्रिके (kushal badrike). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर कुशलने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. कुशल लवकरच हिंदी मालिकाविश्वात पदार्पण करत आहे. त्यामुळे सध्या तो चर्चेत आहे. यामध्येच त्याने शेअर केलेली एक पोस्ट नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आली आहे.

कुशल लवकरच सोनी टीव्हीवरील   "मॅडनस मचाऐंगे" या कॉमेडी शोमध्ये दिसणार आहे. त्यामुळे तो सध्या त्याच्या या आगामी कार्यक्रमाची तयारी करत आहे. यामध्ये त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं आहे. 
कुशल सोशल मीडियावर कायम काही ना काही नवनवीन पोस्ट शेअर करत असतो. यावेळी त्याने त्याचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. मात्र, या फोटोंना त्याने दिलेलं कॅप्शन चर्चेत आलं आहे.


काय म्हणाला कुशल?

"खूप दिवसांपासून बघतोय social media वर माझ्या बाबतीत काहीही लिहून आलं की तेच-तेच photo असतात. म्हणून हे “photos” post करतोय", असं मजेशीर कॅप्शन देत कुशलने ही पोस्ट शेअर केली आहे.

दरम्यान, मराठी कलाविश्व गाजवल्यानंतर कुशलने हिंदी शोमध्ये एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे या नव्या शोमध्ये त्याचा कोणता अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या हिंदी मालिकेत त्याच्या सोबत अभिनेत्री श्रेया बुगडेदेखील झळकणार आहे.

Web Title: marathi actor Kushal Badrike's post about social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.