'शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना शिकवायचा असेल तर...'; गड,किल्ल्यांविषयी मिलिंद गवळींची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 02:24 PM2023-11-19T14:24:19+5:302023-11-19T14:24:56+5:30

Milind gawali: मिलिंद गवळी यांनी अलिकडेच लोहगडाला भेट दिली.

marathi actor Milind Gawli's share special post about chatrapati shivaji maharaj forts | 'शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना शिकवायचा असेल तर...'; गड,किल्ल्यांविषयी मिलिंद गवळींची खास पोस्ट

'शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना शिकवायचा असेल तर...'; गड,किल्ल्यांविषयी मिलिंद गवळींची खास पोस्ट

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेमुळे सातत्याने चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी (milind gawali). नाटक, सिनेमा आणि मालिका अशा सगळ्याच माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. परंतु, सध्या ते आई कुठे काय करते या मालिकेमुळे चर्चेत येत आहेत. मिलिंद गवळी कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे समाजात घडणाऱ्या वा त्यांच्या जीवनातील अनेक किस्से, घडामोडींवर ते भाष्य करत असतात. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड, किल्ले यांच्यावर भाष्य केलं आहे. 

मिलिंद गवळी यांनी महाराजांविषयी बोलत असताना सध्याच्या शालेय मुलांना जर इतिहास समजावून सांगायचा असेल तर त्यांना शाळेत न बसवता गड, किल्ल्यांवर प्रत्यक्षपणे घेऊन जाणं गरजेचं आहे असंही सांगितलं आहे.

काय आहे मिलिंद गवळींची पोस्ट?

"लोहगड” परवा हा गड चढायचा योग आला. खूप छान वाटलं, आपल्याला गड चढता येतो याचं एक वेगळं समाधान असतं, उंच डोंगर चढणं काय साधी गोष्ट नसते, आपण जेव्हा गड चढतो तेव्हा आपल्याला धाप लागत असते, काही लोक थांबत थांबत चढता,  तर काहींचा स्टॅमिना चांगला असतो, ते एका दमात तो गड चढायचा प्रयत्न करतात, दररोज व्यायाम म्हणून गड चढणारे लोक पण आहेत,

एकदा का आपण गडावर पोचलो की एक वेगळं समाधान मिळतं, वेगळीच शांती मिळते, माझ्याबरोबर “ Zen “आमचा कुत्रा होता, तो एका दमात वरती धावत सुटला, त्याचा स्टॅमिना बघून मला त्याचा हेवा वाटला, असं वाटलं की आपल्या मध्ये सुद्धा अशी ताकद असायला हवी, वरती पोहोचल्यावर डोक्यामध्ये असंख्य विचार येत होते,ते विचार असे होते की जर शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना शिकवायचा असेल तर तो वर्गामध्ये बसून न शिकवतात जर आपण गडावरच मुलांना घेऊन गेलो आणि तिथे त्यांना इतिहास शिकवला तर तो त्यांच्या कायमस्वरूपी मनामध्ये घर करून बसेल आणि महाराजांचे विचार त्यांच्यापर्यंत खूप छान पद्धतीने पोचतील, जसं रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतन ची स्थापना केली, एक वेगळी शिक्षण पद्धती तयार केली तशीच आपण का नाही तयार करू शकत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले

पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, राजमाची, विसापूर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, चंद्रगड, सुरगड, घोसाळगड, कडासरी, रायगड, तोरणा, राजगड, सिंहगड आणि विशाळगड.

या सगळ्या गडांवर/ किल्ल्यांवर जर मुलांसाठी शाळा सुरू केल्या, आणि तिथे त्यांना इतिहास शिकवला, तर मला नाही वाटत की या जन्मात ती मुलं कधी आपला महान इतिहास विसरतील. आत्ताच्या आळशी इंटरनेट शिक्षण पद्धतीतून त्यांना बाहेर काढायचे असेल तर त्यांना गड चढायला लावणे आणि गडावर इतिहास शिकवणे हा एक छान पर्याय मला सुचतो आहे.

Web Title: marathi actor Milind Gawli's share special post about chatrapati shivaji maharaj forts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.