प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 02:53 PM2024-11-26T14:53:04+5:302024-11-26T14:53:26+5:30

प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांचा धमाल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय (prasad oak, manjiri oak)

marathi actor Prasad Oak and his wife manjiri oak reel video viral on internet | प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल

प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल

अभिनेता प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी ओक यांचे रील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. प्रसादच्या फिल्मी करिअरमध्ये त्याची पत्नी मंजिरीचंही चांगलंच योगदान आहे. प्रसादने कायमच मंजिरीचं जाहीररित्या यासाठी कौतुक केलंय. अशातच प्रसाद-मंजिरी या पती-पत्नीचा एक रील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत प्रसादने मंजिरीला असं काय विचारलं की तिने थेट चिमटाच गरम केला? जाणून घ्या.

प्रसाद-मंजिरीचा रील व्हिडीओ व्हायरल

प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी यांच्या नवीन रील व्हिडीओत दिसून येतं की, मंजिरी किचनमध्ये चपात्या भाजत असते. तेव्हा प्रसाद विचारतो,"सगळे मित्र-मित्र मिळून बँकॉकला जायचा प्लॅन करत आहेत. मला विचारत आहेत येतो का? बँकॉक, पटाया, फुके" असं म्हणताच मंजिरी गॅसवर चिमटा गरम करते. ते बघून प्रसाद घाबरुन विषय बदलताना दिसतो. "मी मित्रांना म्हटलं की, मी जिकडे जाईन तिकडे मंजूबरोबर जाणार." नंतर मंजू हात वर करुन प्रसादला शांत करते. 


पुढे प्रसाद पुन्हा बायकोपाशी येऊन म्हणतो,"आपण भिवंडीला जाऊया. तिथे सोफ्याची गोडाऊन आहेत मोठी मोठी." मंजू काहीच उत्तर न देता शांत बसते. नंतर प्रसाद निघून जातो. प्रसाद अन् मंजिरी ओकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांनी कमेंट्स करुन व्हिडीओला पसंती दिलीय. प्रसाद यावर्षी धर्मवीर २ मधून भेटीला आला. तो आता लवकरच प्रसाद ओकसोबत 'जिलबी' सिनेमातून झळकणार आहे. 

Web Title: marathi actor Prasad Oak and his wife manjiri oak reel video viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.