कसं होणार? काय होणार? एकाने सांगितले की...', केदार शिंदेंची ती पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 05:37 PM2022-07-04T17:37:37+5:302022-07-04T17:42:33+5:30
केदार शिंदे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट क्षणात व्हायरल होतात. सध्या त्यांची अशीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
केदार शिंदे (Kedar Shinde) या नावाची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांच्या यादीत त्यांचं नाव येतं. केदार शिंदे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट क्षणात व्हायरल होतात. सध्या त्यांची अशीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
केदार शिंदे यांनी स्वामींच्या पुढे बसलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबत ते लिहितात, Verified
३ जुलै १९९७... माझ्या "आमच्या सारखे आम्हीच" या नाटकाचा शुभारंभ. दुपारी साडेतीन वाजता प्रयोग शिवाजी मंदिर मध्ये! कलाकार मंडळी रंगभुषेला बसली आणि मी जवळपास कुठे मंदिर आहे का? या विचाराने बाहेर पडलो. डोक्यात फक्त नाटकाचा विचार. कसं होणार? काय होणार? एकाने सांगितले की पुढे डाव्या बाजूला एक मंदिर आहे... मी वळलो तर एक जुनं मंदिर दिसलं. नमस्कार करून आत शिरल्यावर एक मोठी तसबीर दिसली. त्यावर लिहीलं होतं.. श्री स्वामी समर्थ... ही माझी स्वामींची भेट. आज त्याला २५ वर्ष पुर्ण झाले. मी फक्त स्वामींमुळे आहे.. ही सेवा अखंड सुरू ठेवा हीच त्यांच्या चरणी प्रार्थना!!!
केदार शिंदे यांचा लवकरच ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. शाहीर साबळे यांच्यावर जीवनावर आधारित या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे.चित्रपटात मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) शाहीर साबळेंची भूमिका साकारताना दिसणार आहे. केदार शिंदे या चित्रपटावर गेली अडीच वर्षं काम करत आहेत. जय जय महाराष्ट्र माझा, जेजुरीच्या खंडेराया, या गो दांड्यावरून ही शाहिरांची अजरामर गाणी चित्रपटात असणार आहेत.