क्या बात! सिद्धार्थ चांदेकरचं ट्रान्सफॉर्मेशन, 'इतक्या' दिवसांत कमी केलं तब्बल १६ किलो वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 04:02 PM2023-08-04T16:02:44+5:302023-08-04T16:26:47+5:30

सिद्धार्थ चांदेकरने कमी केलं १६ किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुम्हीही म्हणाल ‘क्या बात’

marathi actor siddharth chandekar loss 16kg weight in just 6 months shared photo | क्या बात! सिद्धार्थ चांदेकरचं ट्रान्सफॉर्मेशन, 'इतक्या' दिवसांत कमी केलं तब्बल १६ किलो वजन

क्या बात! सिद्धार्थ चांदेकरचं ट्रान्सफॉर्मेशन, 'इतक्या' दिवसांत कमी केलं तब्बल १६ किलो वजन

googlenewsNext

सिद्धार्थ चांदेकर हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी आहे. ‘अग्निहोत्र’, ‘प्रेम हे’, ‘जीवलगा’ यांसारख्या मालिकांमध्ये काम करुन तो घराघरात पोहोचला. अगदी कमी काळात कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या कलाकारांपैकी सिद्धार्थ एक आहे. ‘क्लासमेट’, ‘झेंडा’, ‘झिम्मा’ या सुपरहिट मराठी चित्रपटांत त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सिद्धार्थ सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

सिद्धार्थने नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सिद्धार्थचं ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे. सिद्धार्थने अवघ्या सहा महिन्यांत १६ किलो वजन कमी केलं आहे. जानेवारी महिन्यात त्याचं वजन १०३ किलो होतं. ते जून महिन्यात कमी करून त्याने ८७ किलोवर आणलं. सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याचे दोन फोटो आहेत. यातील पहिल्या फोटोत त्याचं वजन वाढलेलं दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत सिद्धार्थ एकदम फिट दिसत आहे. सिद्धार्थच्या या ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

“मी माझ्या आईसाठी अंतवस्त्र खरेदी करतो”, करण जोहरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला...

सिद्धार्थ त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत असल्याचं दिसून येतं. त्याने इन्स्टाग्रामवरुन व्यायाम करतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे. सिद्धार्थने अभिनेत्री मिताली मयेकरबरोबर २०२१ साली लग्नबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात.

Web Title: marathi actor siddharth chandekar loss 16kg weight in just 6 months shared photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.