ती नाही... हा विचारसुद्धा सोसवत नाही...; मराठी कलाकारांनी सिंधुताईंना वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 11:38 AM2022-01-05T11:38:50+5:302022-01-05T11:43:33+5:30
Sindhutai Sapkal : 'समाजसेवेचं एक पर्व संपलं', असं रेणुका शहाणे यांनी लिहिलं. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या सिंधुताईंच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी माईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
अनाथांची माय या नावाने ओळखल्या जाणाऱ्याज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांच्या निधनानंतर सर्वच स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे. राजकीय नेत्यांपासून ते कलाविश्वातील मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित माईंना श्रद्धांजली वाहिली.
‘मी सिंधुताई सपकाळ’ या सिंधुताईंच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी माईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. ‘फ्लॉरेन्स नाईटिंगेलला माझं शेवटचं विनम्र अभिवादन’, अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
My last respects to the Florence Nightingale who touched many lives and changed them… deeply saddened … thanks for making a difference in our lives Mai!
— ANANTH N MAHADEVAN (@ananthmahadevan) January 4, 2022
Padmashri Sindhutai Sapkal🙏🙏🙏 pic.twitter.com/5gSkSh9pUN
अभिनेत्री स्पृहा जोशी हिने कवितेच्या ओळींतून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏#सिंधुताईसपकाळpic.twitter.com/DMzZqkeWbB
— Spruha Joshi (@spruhavarad) January 4, 2022
समाजसेवेचं एक पर्व संपलं - रेणुका शहाणे
पद्मश्री सिंधुताई सपकाळ 🙏🏾🙏🏾
— Renuka Shahane (@renukash) January 4, 2022
समाजसेवेचं एक पर्व संपलं 🙏🏾🙏🏾
भावपूर्ण आदरांजली 🙏🏾🙏🏾
त्यांच्या आजवरच्या महानकार्याला मानाचा मुजरा- सोनाली कुलकर्णी
पद्मश्री, समाजभूषण, अनाथांची यशोदा,
— सोनाली (@meSonalee) January 4, 2022
सगळ्यांची माय सिंधुताई सपकाळ
आज आपल्यात नाहीत. …
खरंच दुःखद घटना
त्यांच्या आजवरच्या महानकार्याला मानाचा मुजरा 🙏🏻
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचर्णी प्रार्थना 🙏🏻#sindhutaisapkal#भावपूर्ण_श्रद्धांजली 🙏🏻 pic.twitter.com/ueePh3gJmo
महाराष्ट्र आज अनाथ झाला- हेमंत ढोमे
अनेक अनाथांची माय, थोर समाजसेविका पद्मश्री सिंधताई सपकाळ यांचे निधन, भावपूर्ण श्रद्धांजली…
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) January 4, 2022
अनाथांची माय हरपली…
महाराष्ट्र आज अनाथ झाला! 🙏🏽
#सिंधुताईसपकाळ#SindhutaiSapkalpic.twitter.com/9hq7ciEvTi
माई... भावपूर्ण श्रध्दांजली-सुबोध भावे
आदरणीय
— Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) January 4, 2022
सिंधुताई सपकाळ
भावपूर्ण श्रद्धांजली
🙏🙏🙏🙏🙏🙏 pic.twitter.com/f386wDP5cG