Teaser : 'पालवी..फुटत नाही, फोडते..'; Timepass 3 मध्ये हृताचा डॅशिंग अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 01:01 PM2022-05-31T13:01:12+5:302022-05-31T13:02:12+5:30

Timepass 3: झी स्टुडिओने नुकताच 'टाईमपास 3' (Timepass 3)  चा टीझर प्रदर्शित केला. या टीझरमध्ये  चित्रपटाची थोडक्यात झलक दाखवण्यात आली असून अभिनेत्री हृता दुर्गुळे हिच्या भूमिकेवरील पडदाही दूर करण्यात आला आहे.

marathi actors Hruta Durgule Prathamesh Parab upcoming movie Timepass 3 Official Teaser out | Teaser : 'पालवी..फुटत नाही, फोडते..'; Timepass 3 मध्ये हृताचा डॅशिंग अंदाज

Teaser : 'पालवी..फुटत नाही, फोडते..'; Timepass 3 मध्ये हृताचा डॅशिंग अंदाज

googlenewsNext

रवि जाधव दिग्दर्शित (ravi jadhav) टाईमपास  (Timepass) हा चित्रपट विसरणं सध्याच्या घडीला कोणत्याही प्रेक्षकासाठी शक्य नाही. केतकी माटेगावकर (ketaki mategaonkar) आणि प्रथमेश परब (prathamesh parab)यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. अगदी दगडूच्या डायलॉग्सपासून ते चित्रपटातील गाण्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट चर्चिली गेली. विशेष म्हणजे पहिल्या भागाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग 'टाईमपास 2' (Timepass 2)  देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर आता या चित्रपटाचा तिसरा भागही प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकताच 'टाईमपास 3' (Timepass 3)  चा टीझर प्रदर्शित झाला असून या चित्रपटात अभिनेत्री हृता दुर्गुळे मुख्य भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं आहे.

झी स्टुडिओने नुकताच 'टाईमपास 3' (Timepass 3)  चा टीझर प्रदर्शित केला. या टीझरमध्ये चित्रपटाची थोडक्यात झलक दाखवण्यात आली असून अभिनेत्री हृता दुर्गुळे हिच्या भूमिकेवरील पडदाही दूर करण्यात आला आहे. सोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे.
प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये 'टाईमपास' (Timepass) आणि 'टाईमपास 2' (Timepass 2)  या चित्रपटाची झलकही दाखवण्यात आली आहे. तसंच 'टाईमपास 3' (Timepass 3)  मध्ये आता एक नवी कथा उलगडली जाणार आहे.

 या चित्रपटात दगडू आणि पालवीच्या गोष्टी उलगडली जाणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात हृता पहिल्यांदाच इतक्या बोल्ड आणि डॅशिंग अंदाज प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात हृता पालवी दिनकर पाटील ही भूमिका साकारणार आहे.

दरम्यान, हा चित्रपट येत्या २९ जुलै २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात हृतासोबत प्रथमेश परब, वैभव मांगले ही कलाकार मंडळी झळकणार आहे. मात्र, अन्य भूमिकांवरील पडदा अद्याप दूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे अन्य कलाकार अद्यापही गुलदस्त्यात आहेत.
 

Web Title: marathi actors Hruta Durgule Prathamesh Parab upcoming movie Timepass 3 Official Teaser out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.