अतुल विरकर या मराठी अभिनेत्याच्या मुलाच्या मदतीसाठी पुढे आले मराठी कलाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 05:36 PM2021-05-04T17:36:00+5:302021-05-04T17:36:24+5:30

अतुलने सोशल मीडियाद्वारे केलेल्या आवाहनानंतर आता अनेक मराठी कलाकार त्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

Marathi actors supports atul varekar to help atul virkar's son treatment | अतुल विरकर या मराठी अभिनेत्याच्या मुलाच्या मदतीसाठी पुढे आले मराठी कलाकार

अतुल विरकर या मराठी अभिनेत्याच्या मुलाच्या मदतीसाठी पुढे आले मराठी कलाकार

googlenewsNext
ठळक मुद्देअतुल ठाण्यातील वर्तक नगर परिसरात राहात असून त्याचा मुलगा प्रियांशला एक महिन्याचा असताना फिट आली होती. तेव्हापासून त्याला बॅलेन्स नाहीये.

अभिनेता अतुल विरकरने माझ्या नवऱ्याची बायको, तू माझा सांगाती, लव्ह लग्न लोचा यांसारख्या अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तो तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत झळकला होता. पण कोरोनाच्या परिस्थितीमुळे गेल्या वर्षभरात त्याला काम मिळण्याचे प्रमाण प्रचंड कमी झाले असून त्याची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. त्यात त्याच्या मुलाला एक दुर्दम्य आजार असल्याने त्याच्या उपचाराचा खर्च त्याला परवडत नाहीये. त्यामुळे त्याने सोशल मीडियाद्वारे लोकांकडे मदतीचे आवाहन केले होते. 

अतुलने सोशल मीडियाद्वारे केलेल्या आवाहनानंतर आता अनेक मराठी कलाकार त्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. वरद विजय चव्हाण, मनीषा केळकर, रमेश वाणी, जयवंत वाडकर, उमेश बोळके, आदिती सारंगधर, विजय पाटकर, कांचन पगारे, ज्ञानेश वाडेकर, दिग्दर्शक किशोर बेळेकर या कलाकारांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत प्रियांशला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत लोकांनी करावी असे आवाहन केले आहे.

Namaskar mitranno aaple mitra Atul Virkar hyancha mulga priyansh eka rare aajarala samora jatoy...sarvanna vinanti aahe ki ekda hi post vacha aani jamlyas Atul virkar hyanna madaticha haath dya🙏

Posted by Varad Vijay Chawan on Saturday, April 17, 2021

अतुल ठाण्यातील वर्तक नगर परिसरात राहात असून त्याचा मुलगा प्रियांशला एक महिन्याचा असताना फिट आली होती. तेव्हापासून त्याला बॅलेन्स नाहीये. त्याला डेव्हलपमेंट डिले डिसऑर्डर हा आजार असल्याचे त्यावेळी निदान झाले. त्यामुळे त्याला त्याची मान पकडता येत नाही. त्याने गेल्या वर्षभरात तीन लाख रुपये तरी खर्च केला आहे. हा आजार असलेला भारतातील तो एकमेव रुग्ण असून जगातला 23 वा रुग्ण आहे. त्याच्या उपचारासाठी आठ ते दहा लाख रुपयांची गरज असून त्याने लोकांकडे मदत मागितली आहे.

Web Title: Marathi actors supports atul varekar to help atul virkar's son treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.