Video: अंकिता- अभिज्ञाच्या दिलखेचक अदा; माधुरी दीक्षितच्या गाण्यावर धरला ठेका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 08:21 PM2021-11-17T20:21:38+5:302021-11-17T20:22:24+5:30

Ankita lokhande: सध्या या दोघी 'पवित्र रिश्ता'च्या दुसऱ्या भागात झळकत आहेत. या सेटवरील अनेक फोटो, व्हिडीओ त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात.

marathi actress abhidnya bhave and ankita lokhande share dance video on madhuri dixit Sailaab movie song | Video: अंकिता- अभिज्ञाच्या दिलखेचक अदा; माधुरी दीक्षितच्या गाण्यावर धरला ठेका

Video: अंकिता- अभिज्ञाच्या दिलखेचक अदा; माधुरी दीक्षितच्या गाण्यावर धरला ठेका

googlenewsNext

कलाविश्वात फार मोजके असे सेलिब्रिटी पाहायला मिळतात जे पडद्यामागेही एकमेकांचे चांगले मित्र किंवा मैत्रिणी आहेत. यातलीच एक जोडी म्हणजे अंकिता लोखंडे (ankita lokhande) आणि अभिज्ञा भावे (abhidnya bhave).  या दोघीही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी असून अनेकदा सोशल मीडियावर त्या एकमेकींसोबतच फोटो वा व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या या दोघी 'पवित्र रिश्ता'च्या दुसऱ्या भागात झळकत आहेत. या सेटवरील अनेक फोटो, व्हिडीओ त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. यामध्येच त्यांनी माधुरी दीक्षितच्या (madhuri dixit) एका गाण्यावर डान्स केला आहे.

अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवर पवित्र रिश्ताच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे.  या व्हिडीओमध्ये अभिज्ञा आणि अंकिता या दोघी जणी सैलाब (Sailaab)चित्रपटातील 'हम को आज कल है इंतजार...'या गाण्यावर डान्स करतांना दिसत आहेत. विशेष म्हणजे या दोघींनी एक्स्प्रेशन्स आणि डान्स स्टेप्स अगदी माधुरी सारख्या फॉलो केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा हा व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत आहे.


दरम्यान, अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच प्रियकर विकी जैनसोबत लग्नगाठ बांधणार आहे. अलिकडेच अंकिताने तिच्या गर्ल गँगसोबत sprinters party केली. या पार्टीमध्ये हिंदी कलाकारांसोबतच मराठी कलाविश्वातील काही लोकप्रिय अभिनेत्रीदेखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. 

Web Title: marathi actress abhidnya bhave and ankita lokhande share dance video on madhuri dixit Sailaab movie song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.