Abhidnya Bhave : ‘मला माझ्याच शहरात असुरक्षित वाटू लागलं आहे...’; अभिज्ञा भावेसोबत घडला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 10:34 AM2022-05-27T10:34:41+5:302022-05-27T11:10:31+5:30

Abhidnya Bhave : काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप याच्यासोबत रात्री प्रवास करताना एक थरारक घटना घडली होता. आता टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे हिच्यासोबतही असाच थरारक प्रसंग घडला आहे.

marathi actress abhidnya bhave faced shocking phone robbery insidence in mumbai | Abhidnya Bhave : ‘मला माझ्याच शहरात असुरक्षित वाटू लागलं आहे...’; अभिज्ञा भावेसोबत घडला धक्कादायक प्रकार

Abhidnya Bhave : ‘मला माझ्याच शहरात असुरक्षित वाटू लागलं आहे...’; अभिज्ञा भावेसोबत घडला धक्कादायक प्रकार

googlenewsNext

काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप याच्यासोबत रात्री प्रवास करताना एक थरारक घटना घडली होता. आता टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) हिच्यासोबतही असाच थरारक प्रसंग घडला आहे. अभिज्ञाने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत, हा थरारक व धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.  अभिज्ञा शूटींग संपवून रात्री 10.30 च्या सुमारास रिक्षाने घरी निघाली होती. अशात दोन भामट्यांनी चालत्या रिक्षातून तिच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. यादरम्यान अभिज्ञाच्या हातालाही दुखापत झाली. अभिज्ञाने ही सविस्तर घटना आपल्या पोस्टमधून सांगितली आहे.

अभिज्ञा भावेची पोस्ट-

आजकाल मी सोशल मीडियाचा वापर क्वचितच करते. परंतु अलीकडे माझ्यासोबत घडलेली एक घटना सर्वांना सांगणे आवश्यक आहे. कारण बºयाच लोकांना अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला असेल,अशी मला खात्री आहे. कदाचित ही पोस्ट तुम्हाला अशा घटनांपासून वाचवेल. तो नेहमीप्रमाणे शूटिंगचा दिवस होता. मी  10. 30 पर्यंत पॅकअप केलं. माझ्याकडे माझी कार नसल्याने मी सार्वजनिक वाहतूक (रिक्षा) सेवा निवडली.कोणतीही सामान्य मुलगी घरी परत जाण्यासाठी करते, तशीच मी रिक्षाची प्रतीक्षा करत थांबले. 5 मिनिटांनी मला एक रिक्षा मिळाली. मी माझी बॅग ठेवली आणि रिक्षात चढले. अवघी 10 मिनिटं झाली असतील, मी  11. 10- 11. 15 च्या सुमारास ठाण्यातील विवियाना ब्रिज फ्लायओव्हरवर होते. तेव्हा बाईकवरून दोन जण आले. माझ्या रिक्षाच्या डाव्या बाजूला ते आले आणि त्यांनी हिसकावण्यासाठी माझा मोबाईल पकडला. मी रिक्षाच्या मधोमध बसले होते.


 
60किमी/तास वेगाने सुमारे 3-4 सेकंद चाललेला हा संघर्ष होता (दोन्ही दुचाकी आणि रिक्षा धावत होत्या). अखेर खूप संघर्षानंतर ते त्यांच्या प्रयत्नात यशस्वी झाले. त्यांनी माझा मोबाईल इतक्या वाईट रीतीने हिसकावला की माझा हातही दुखावला गेला. माझा फोन गेला त्या क्षणी मी सुन्न झाले होते. पण पुढच्याच क्षणी माझ्या मनात बाईकचा नंबर लिहायचा विचार आला. पण बाईकला नंबर प्लेट नव्हती. रिक्षाचालकाने बाईकचा पाठलाग करण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण ते हाती लागले नाहीत. दोन्ही मुलं जवळजवळ विशीमधली होती. पाहायला चांगल्या कुटुंबातील वाटत होती. अंधार असल्याने त्यांचे चेहरे दिसत नव्हते. पोलीस स्टेशनला थांबण्याचा विचार केला. पण रात्री उशिर झाल्याने आधी घरी पोहोचणे सर्वात सुरक्षित असेल असं मला वाटलं.

याबाबत मी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पण एक नोकरदार महिला म्हणून माझा सगळा डेटा मोबाईलवर असल्याने मला भीती वाटत होती. कारण आजकाल आपली सर्व महत्त्वाची कामे फोनवर होत असल्याने फोन ही खरोखरच एक गरज आहे. या घटनेने मला माझ्याच शहरात असुरक्षित वाटू लागले आहे. अशी भावना मी यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती. दोन दिवसांनी जेव्हा मी सेटवर परतले तेव्हा मला त्याच भागात माझ्या इतर दोन सहका-यांसोबत अशाच दोन घटना घडल्या असल्याचं समजलं. याचा अर्थ ठाण्यात अशा घटना सर्रास घडतात किंवा ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर हे नेहमीच चित्र आहे.

मी हे लिहिण्याचे कारण म्हणजे मुंबई पोलीस मुंबई जीआरपी उद्धव ठाकरे  यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी. किमान या भागात ही एक गंभीर समस्या बनली आहे. सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करताना सार्वजनिक व्यक्ती म्हणून आपल्या सर्वांना सुरक्षित वाटणे आवश्यक आहे. माझ्याकडे  नवीन गॅझेट खरेदी करण्याचा पर्याय आहे. परंतु बºयाच सामान्य लोकांना ते परवडत नाही. आपल्या मालकीचा ताबा अशा प्रकारे हिसकावून घेतला जाऊ शकत नाही आणि नसावा!!! कोणत्याही प्रकारच्या दरोड्यासाठी कायदा अधिक कडक व्हायला हवा. तसेच सर्वसामान्यांना अधिक सुरक्षित वाटावे यासाठी महामार्गावर सुरक्षा कॅमेरे लावायला हवेत. यावेळी तो फक्त फोन होता. पण कदाचित जीव धोक्यात आला आहे. मी आशा करते आणि प्रार्थना करते की ही घटना पुन्हा घडू नये. आणि तसे झाल्यास योग्य कारवाई केली जाईल आणि कायदे कडक केले जातील. ही मुंबईतील एका सामान्य नागरिकाची विनंती आणि आवाहन आहे.

Web Title: marathi actress abhidnya bhave faced shocking phone robbery insidence in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.