'माझी प्रिन्सेस...' अभिज्ञा भावेच्या आजीचं निधन, शेअर केली भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 10:11 AM2023-09-03T10:11:03+5:302023-09-03T10:11:52+5:30

अभिज्ञाची आजी ९३ वर्षांची होती.

marathi actress abhidnya bhave grandmother passed away actress shared emotional post | 'माझी प्रिन्सेस...' अभिज्ञा भावेच्या आजीचं निधन, शेअर केली भावूक पोस्ट

'माझी प्रिन्सेस...' अभिज्ञा भावेच्या आजीचं निधन, शेअर केली भावूक पोस्ट

googlenewsNext

मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या (Abhidnya Bhave) आजीचं वृद्धपकाळाने निधन झालं. आजीसोबतचा गोड फोटो शेअर करत तिने अतिशय भावूक कॅप्शनही लिहिलं आहे. अभिज्ञाची आजी ९३ वर्षांची होती. नव्वदीतही तिचा उत्साह काही कमी नव्हता. अभिज्ञासाठी ती आजी कमी आणि मैत्रिणच जास्त होती. आजीच्या निधनानंतर अभिज्ञा खूपच भावूक झाली आहे. तिने पोस्ट शेअर करत भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

अभिज्ञाची सोशस मीडियावर पोस्ट,

"माझी सर्वात खास आणि खोडकर मुलगी,

मला माहीत आहे की तु ९३ वर्षे आनंदात जगलीस, सगळ्यांनी तुझ्यावर प्रेम केलं आणि तू सर्वांना एकत्र बांधून ठेवलंस. पण आता मी खोलीतलं ते तेजस्वी हसू, तुझ्या डोळ्यातील चमक, जुनी हळुवार मिठी, मला पडद्यावर पाहून तुझा उजळणारा चेहरा हे सगळं खूप मिस करेन. वयाच्या नव्वदीतही तुला छान तयार होण्याची आवड होती. आपण कसं दिसतोय हे तुझ्यासाठी महत्वाचं होतं. गॉगल्स, साड्या, खाऊ, स्वयंपाकघर, क्रोशाचे काम यावर तुझं विशेष प्रेम होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या सर्वात मोठ्या  चाहतीला मिस करेन जी नेहमीच माझ्या बाजूने असायची.'

अभिज्ञा पुढे लिहिते,' ठामपणे मत व्यक्त करता आलं पाहिजे असा तुझा नेहमी आग्रह असायचा, तुझी खेळकर वृत्ती, ९ पिढ्यांमध्ये तू सहजतेने सामावून गेलीस असा तुझा स्वभाव होता. ते सगळं मी आत्मसात करेन. कारण शेवटी ते आपल्या रक्तातच आहे. तुला माझा नक्की अभिमान वाटेल  आणि मी आयुष्यभर तुझ्या आठवणी माझ्या हृदयात जपून ठेवेन.

तू माझ्यासाठी कायम खास होतीस, आहेस आणि असशील. तू मला एक चांगली व्यक्ती बनवलंस आणि तुझ्यातील लहान मुलाने मला एक चांगली आई बनवलं.
अशीच चमकत राहा. माझी राजकुमारी प्रमिला भावे.'

अभिज्ञाच्या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत तिची आजी प्रमिला भावे यांना आदरांजली वाहिली आहे. अभिज्ञाने लिहिल्याप्रमाणेच तिच्या आजीच्या फोटोतून चेहऱ्यावरचं तेज झळकताना दिसतंय. आजीच्या निधनानंतर नातीच्या आयुष्यात नक्कीच एक पोकळी निर्माण होते. अभिज्ञाने तीच भावना आपल्या पोस्टमधून व्यक्त केली आहे.

Web Title: marathi actress abhidnya bhave grandmother passed away actress shared emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.