म्हातारचळ लागलेले आजीआजोबा! नेटकऱ्याच्या ट्रोलिंगवर ऐश्वर्या नारकरांनी दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 09:37 AM2023-10-12T09:37:16+5:302023-10-12T09:37:57+5:30

अविनाश नारकर-ऐश्वर्या नारकर पुन्हा ट्रोल, अभिनेत्रीचं रोखठोक उत्तर

marathi actress aishwarya narkar give back to trollers who commented on couple s video | म्हातारचळ लागलेले आजीआजोबा! नेटकऱ्याच्या ट्रोलिंगवर ऐश्वर्या नारकरांनी दिलं सडेतोड उत्तर

म्हातारचळ लागलेले आजीआजोबा! नेटकऱ्याच्या ट्रोलिंगवर ऐश्वर्या नारकरांनी दिलं सडेतोड उत्तर

मराठीतील लोकप्रिय जोडी अविनाश नारकर (Avinash Narkar) आणि ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) त्यांच्या रील्समुळे चर्चेत असतात. दोघंही मराठीतील प्रसिद्ध कलाकार आहेत मात्र सध्या अविनाश नारकर त्यांच्या विचित्र हावभावांमुळे ट्रोल होत आहेत. या वयात हे शोभतं का असं म्हणत नेटकरी त्यांची खिल्ली उडवत आहेत. दरम्यान एका युझरने तर त्यांच्या व्हिडिओवर 'म्हातारचळ लागलेले आजीआजोबा' अशी कमेंट केली आहे. यावर ऐश्वर्या नारकर यांनी सडेतोड उत्तर दिलंय.

सध्या सगळ्यांनाच रील्सचं वेड लागलंय. इन्स्टाग्रामवर काहीही ट्रेंड झालं की त्यावर रील झालंच पाहिजे. नारकर कपलही यात मागे नाही. 'बादल बरसा बिजुली...' ते 'आमच्या पप्पांनी गंपती आणला' सारख्या सर्वच रील्सवर त्यांनी व्हिडिओ केलाय.नुकतंच त्यांनी एक रील व्हिडिओ पोस्ट केला. घरातल्या कपड्यातील आणि मग ट्रेडिशनल कपड्यातील व्हिडिओचं ते फ्युजन होतं. 'प्यार तेरा...रुप तेरा' या गाण्यावर ते रील आहे. नारकरांच्या या व्हिडिओवर एकाने कमेंट करत लिहिले,'म्हातारचळ लागलेले आजीआजोबा'. 

अशी कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर या शांत बसल्या नाहीत. त्यांनी त्या कमेंटवर सडेतोड उत्तर देत लिहिले, 'बुद्धी गंजेल असे विचार करुन..तुमच्या घराण्यात म्हातारचळ लागण्याचा रोग आहे वाटतं...जगून घ्या गेलात तर सगळंच राहून जाईल दुसऱ्यांना बोलण्यात...म्हातारचळचा अर्थही बघून घ्या जरा..बुद्धी भ्रष्ट'

नारकर जोडीच्या या व्हिडिओवर काहींनी कमेंट करत त्यांचं कौतुकही केलंय. 'ते दोघे मस्त आयुष्य जगत आहेत..वयाचा प्रश्न येतो कुठे' असं म्हणत नेटकऱ्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

Web Title: marathi actress aishwarya narkar give back to trollers who commented on couple s video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.