Satish Kaushik : “जुनं calendar घरात ठेऊ नये पण...”' सतीश कौशिक यांच्या आठवणीत हेमांगी कवीची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 12:02 PM2023-03-09T12:02:54+5:302023-03-09T12:03:31+5:30
Satish Kaushik , Hemangi Kavi : मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी हिने सतीश कौशिक यांच्याबद्दल एक भावुक पोस्ट शेअर केलीये.
Satish Kaushik Passed Away: बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते सतिश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्याबद्दल खास पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिलीये. मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) हिनेही सतीश कौशिक यांच्याबद्दल एक भावुक पोस्ट शेअर केलीये. Can we skip this day from our Calendar? असं म्हणत तिने पोस्टची सुरूवात केलीये...
ती लिहिते, Can we skip this day from our Calendar? लहानपणी आईने थोडा उशीर केला जेवण वाढायला की समोरचं ताट हातात घेऊन ते Glass ने बडवत “Calendar खाना दो” मोठमोठ्याने म्हणायचं.
मग आई “असं ताट वाजवू नये” म्हणून आम्हांला बडवायची. पण आम्ही कुठे ऐकतोय तिचं. ती जी सवय लागली ती आजतागायत. काय गंमत होती किंवा आहे त्यात कुणास ठाऊक. तुमच्या सोबत काम करताना मी हा किस्सा तुम्हांला सांगितला तेव्हा तुम्ही हसून म्हणाला, “80-90s के हर बच्चे की यही कहानी है!” 80-90 च्या दशकातल्या मुलांचं बालपण तुमच्या Calender ने समृद्ध केलंय आणि मनात कायमचं Tick ही करून ठेवलंय! असं म्हणतात जुनं calendar घरात ठेऊ नये पण हे Calendar मनाच्या भिंतीवर, आठवणींच्या खिळ्याला सदा अडकवलेलं राहील. It was pleasure working with you Satish ji!
अभिनयच नव्हे तर लेखक, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिका सतीश कौशिक यांना १९८७ मध्ये आलेल्या मिस्टर इंडिया या सिनेमातील कॅलेंडर या भूमिकेने वेगळी ओळख दिली. आजही त्यांची ही भूमिका चाहत्यांच्या चांगलीच लक्षात आहे.