'कुठल्याही परिस्थितीत साथ सोडायची नाही'; हेमांगी कवीची 'ती' खास पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 12:27 PM2021-12-27T12:27:13+5:302021-12-27T12:27:55+5:30

Hemangi kavi: अलिकडेच हेमांगीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या नवऱ्यासोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत.

marathi actress hemangi kavi wish husband sandeep dhumal happy wedding anniversary | 'कुठल्याही परिस्थितीत साथ सोडायची नाही'; हेमांगी कवीची 'ती' खास पोस्ट चर्चेत

'कुठल्याही परिस्थितीत साथ सोडायची नाही'; हेमांगी कवीची 'ती' खास पोस्ट चर्चेत

googlenewsNext

स्पष्टवक्तेपणा आणि रोकठोक वक्तव्य यांमुळे कायम सोशल मीडियावर चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी.  समाजात घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर हेमांगी तिचं मत थेट मांडत असते. यात अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. परंतु, ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत हेमांगी तिचं मत मांडत असते. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या हेमांगीने अलिकडेच तिच्या नावाविषयी एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला होता. त्यानंतर आता तिने खास शब्दांमध्ये तिच्या नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अलिकडेच हेमांगीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या नवऱ्यासोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. तसंच त्याच्यासाठी एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. 

काय आहे हेमांगीची पोस्ट? 

"लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! या वर्षांपासून आपल्या लग्नाला किती वर्षे झाली बोलून वर्ष मोजायची नाहीत तर प्रत्येक क्षण जगायचा! एकमेकांना सहन करत आलो वगैरे तर मुळीच म्हणणार नाही कारण आपल्याला माहितेय आपण कसे आहोत आणि काय आहोत एकमेकांसाठी आणि हे माहित असणंच जास्त महत्वाचं आहे. आपल्या संसाराच्या सुरुवातीच्या काळात माझं चिडणं तुझं कमालीचं शांत असणं, मी अति romantic तू unromantic असणं, मी अति practical तू तेवढाच emotional असणं, मी चेंगुस तू खर्चिक असणं. इतक्या वर्षाच्या सहवासमुळे आपल्यातली ही विसंगती सुसंगतीत बदल्याचं श्रेय आपल्या दोघांचं! कुठल्याही परिस्थितीत एकमेकांची साथ सोडायची नाही हे इतक्या वर्षात आपल्याला जमलंय, या पुढे ही जमवू तेवढा समंजसपणा दोघांना ही लाभो!

आतापर्यंत आपल्या दोघांच्याही आयुष्यात मोहाचे क्षण आले असतील, पुढे ही येतील पण तरीही त्या उपर जाऊन आपण एकमेकांना निवडलंय आणि निवडू कुठल्याही आसक्ती शिवाय यातच आपल्या प्रेमाचं, संसाराचं यश आहे. एकमेकांना जिंकल्याचं प्रतीक आहे.
एकमेकांशिवाय राहू शकत नाही ते आता... एकमेकांना सोडू शकत नाही दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! भांडत राहू, वाईट परिस्थितीशी झगडत राहू, आनंदी राहू, समाधानी राहू!", अशी पोस्ट हेमांगीने शेअर केली आहे. 

दरम्यान, हेमांगी कवीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होत आहे. यापूर्वी हेमांगीने तिच्या नावाचा किस्सा सांगितला होता. जन्मानंतर अनेक दिवस तिचं नावच ठेवलं नव्हतं. अखेर एका डॉक्टरांनी तिचं नाव 'हेमांगी' असं ठेवल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
 

Web Title: marathi actress hemangi kavi wish husband sandeep dhumal happy wedding anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.