'शुभविवाह' फेम अभिनेत्रीच्या कुटुंबातील व्यक्तीचं निधन, शेअर केली भावुक पोस्ट; म्हणाली- "प्रत्येक एपिसोड आवर्जून पाहणारे..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 04:55 PM2024-11-26T16:55:16+5:302024-11-26T17:01:04+5:30
कुंजिकाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या घरातील जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. कुंजिकाने भावुक पोस्ट शेअर करत तिचं दु:ख व्यक्त केलं आहे.
कुंजिका काळवीट हा मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कुंजिका अभिनय करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. कुंजिकाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या घरातील जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. कुंजिकाने भावुक पोस्ट शेअर करत तिचं दु:ख व्यक्त केलं आहे.
कुंजिकाच्या नवऱ्याच्या मामाचं निधन झालं आहे. अभिनेत्रीने त्यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.
मामा…
हा शब्दच केवढा गोड आहे ना...आणि आमचे मामा त्याहूनही गोड! ♥️मनोज मामा…
खरं तर तुम्ही निखिलचे मामा पण हे तुम्ही मला कधीच जाणवू दिलं नाही. जणू माझेच “हक्काचे मामा”.माझं लग्न लवकर झाल्यामुळे मनात बऱ्याच वेळा धागधुग असायची. लग्न झालं की नाती बदलतात. पण कुटुंबात काही जण असे असतात जे सासर माहेर ह्या पलीकडे जाऊन प्रेम करतात. तुम्ही अगदी तसंच केलंत. मनोज मामा तुम्ही मला किती पटकन आपलंस केलंत!
अतिशय निर्मळ, प्रेमळ, नेहमी प्रसन्न राहणारे असे.
तुमच्यासाठी जशी गार्गी तशीच मी.
माझ्या प्रत्येक शोचा प्रत्येक एपिसोड आवर्जून पाहणारे, सगळे interview बघणारे...माझा सगळ्यात loyal audiance !!
सासरे नाहीच, मनोज मामा म्हणजे कधी वडील, कधी वयानी मोठा असलेला मित्र तर कधी सल्लागार.
घरात काहीही झालं की आधी फोन जाणार तो मनोज मामाला.आमच्या नेहमीच छान गप्पा व्हायच्या. कामात अजून प्रगती कशी करता येईल हे अगदी जरुर नमूद करायचे. वेगळीच गट्टी होती मामा तुमच्याशी आणि ती मी कायम खूप miss करणारे.
तुम्ही खूप धिराने इतक्या मोठ्या आजाराला टक्कर दिलीत जराही कूरकूर न करता, जमेल तितक्या स्वावलंबी पणे जमेल तसं सगळं केलंत. आणि अर्थात ह्या सगळ्यात मामीची साथ खरंच खूप मोलाची ठरली. त्यांनी जे आणि जितकं केलं ते इतर कोणी करूच शकलं नसतं. जोडीदार म्हणजे काय ह्याच प्रत्यक्ष उदाहरण!!
अचानक बाप्पाला तुमची आठवण आली आणि अगदीच एका दिवसात तुम्हाला आमच्यातून घेऊन गेला. अजून थोड थांबायला हवं होतं मामा. तुमची उणीव नेहमीच जाणवत राहील.
माझ्या मनात आयुष्यभर "मामा" ही जागा रिकामी राहील.तुमचे भाचे (निखिल सौरभ) अगदी तुमच्या सारखेच आहेत आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे.
गार्गीवरचं माझं प्रेमही तुम्हाला माहितीये.
त्यामुळे आता इथली काळजी करू नका.तुम्हाला तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा.
जिथे असाल तिथून फक्त लक्ष ठेवा 🙏I will miss you lifetime mama
Lots of love
Kunjika
कुंजिकाच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, कुंजिकाला 'स्वामिनी' मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. सध्या ती 'शुभविवाह' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.