लंडनच्या रस्त्यावर झळकलं महाराष्ट्र सरकारचं पोस्टर; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटो पाहून मराठी अभिनेत्री म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 06:16 PM2023-10-06T18:16:35+5:302023-10-06T18:21:04+5:30

लंडनच्या रस्त्यावर महाराष्ट्र सरकारचं पोस्टर झळकलेलं दिसलं. तिथे ठिकठिकाणी वाघनखांसंदर्भात पोस्टर लावण्यात आले आहेत.

marathi actress mira jagannath shared video of wagh nakh poster flaunting on london wall | लंडनच्या रस्त्यावर झळकलं महाराष्ट्र सरकारचं पोस्टर; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटो पाहून मराठी अभिनेत्री म्हणते...

लंडनच्या रस्त्यावर झळकलं महाराष्ट्र सरकारचं पोस्टर; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटो पाहून मराठी अभिनेत्री म्हणते...

googlenewsNext

मीरा जगन्नाथ ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'बिग बॉस मराठी'मधून प्रसिद्धीझोतात आलेल्या मीराने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. मीराचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबाबत मीरा तिच्या चाहत्यांना पोस्टद्वारे माहिती देत असते. 

सध्या मीरा कामानिमित्त लंडनमध्ये आहे. लंडनमधील एक व्हिडिओ मीराने शेअर केला आहे. मीराला लंडनच्या रस्त्यावर महाराष्ट्र सरकारचं पोस्टर झळकलेलं दिसलं. लंडनमध्ये असलेली शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. याबाबत करार करण्यासाठी नुकतंच सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला गेले होते. लंडनमध्ये ठिकठिकाणी वाघनखांसंदर्भात पोस्टर लावण्यात आले आहेत. याची झलक मीराने तिच्या व्हिडिओतून दाखवली आहे. 

मीराने शेअर केलेल्या व्हिडिओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुधीर मुनगंटीवार यांचा फोटो पोस्टवर दिसत आहे. त्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि त्यावर वाघनखं असं लिहिलेलं दिसत आहे. मीराने हा व्हिडिओ शेअर करत "गर्व असलेला भारतीय", असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. 

'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतून मीरा घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने मोमो हे पात्र साकारलं होतं. त्यानंतर मीरा 'ठरलं तर मग' मालिकेत दिसली होती. आता लग्नाळू गाण्यातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 

Web Title: marathi actress mira jagannath shared video of wagh nakh poster flaunting on london wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.