Video: तू चंचला, तू कामिनी.. ! मुक्ताचा साधेपणा पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 04:36 PM2023-03-02T16:36:37+5:302023-03-02T16:37:15+5:30

Mukta barve: मुक्ताने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने अत्यंत साधा लूक केला आहे.

marathi actress mukta barve share video on instagram | Video: तू चंचला, तू कामिनी.. ! मुक्ताचा साधेपणा पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

Video: तू चंचला, तू कामिनी.. ! मुक्ताचा साधेपणा पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

googlenewsNext

मराठी कलाविश्वातील गुणी आणि तितकीच अभ्यासू अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे (mukta barve). आजवरच्या कारकिर्दीत मुक्ताने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची चांगलीच छाप उमटवली आहे. सोशल मीडियावर मुक्ताचे असंख्य चाहते असून ती कायम त्यांच्यासोबत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

मुक्ताने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने अत्यंत साधा लूक केला आहे. मात्र, तिच्यातील हा साधेपणा सुद्धा चाहत्यांना मोहून टाकत आहे. मुक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला Tum Tak Acoustic Cover हे गाणं सुरु असल्याचं ऐकायला मिळत आहे. तसंच तिने मरुन रंगाचा छानसा वनपीस फ्रॉक परिधान केला आहे. 

दरम्यान, मुक्ताचा हा साधेपणाच चाहत्यांना चांगलाच भावला आहे. मुक्ताने विविध माध्यमातून तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत.
 

Web Title: marathi actress mukta barve share video on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.