लेकीचा अभिमान! मुलीच्या सिनेमाच्या पोस्टरसोबत वडिलांनी काढला फोटो, अभिनेत्री म्हणते- "सगळं प्रमोशन एकीकडे आणि..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 11:33 AM2024-07-26T11:33:09+5:302024-07-26T11:33:34+5:30

रुचिराच्या वडिलांनी अभिनेत्रीच्या 'बाबू' सिनेमाच्या पोस्टरबरोबर ठाणे स्टेशनबाहेर फोटो काढला आहे. लेकीचा अभिमान वाटणाऱ्या वडिलांचा हा फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

marathi actress ruchira jadhav father click photo with daughter babu movie poster shared post | लेकीचा अभिमान! मुलीच्या सिनेमाच्या पोस्टरसोबत वडिलांनी काढला फोटो, अभिनेत्री म्हणते- "सगळं प्रमोशन एकीकडे आणि..."

लेकीचा अभिमान! मुलीच्या सिनेमाच्या पोस्टरसोबत वडिलांनी काढला फोटो, अभिनेत्री म्हणते- "सगळं प्रमोशन एकीकडे आणि..."

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून अभिनेत्री रुचिरा जाधव घराघरात पोहोचली. 'बिग बॉस मराठी'मुळे ती चर्चेत आली होती. आता रुचिरा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'बाबू' या सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात ती महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या रुचिरा या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अशातच अभिनेत्रीने एक खास पोस्ट तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. 

रुचिराच्या वडिलांनी अभिनेत्रीच्या 'बाबू' सिनेमाच्या पोस्टरबरोबर ठाणे स्टेशनबाहेर फोटो काढला आहे. लेकीचा अभिमान वाटणाऱ्या वडिलांचा हा फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत रुचिराने पोस्ट लिहिली आहे. "सगळं प्रमोशन एकीकडे, आणि पप्पांनी ऑफिसवरून येताना ठाणे स्टेशनला काढून पाठवलेला हा  फोटो एकीकडे...Love you पप्पा", असं रुचिराने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


दरम्यान, रुचिराचा 'बाबू' सिनेमा येत्या २ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेता अंकित मोहन मुख्य भूमिकेत आहे. अस्सल आगरी कोळी भाषेतला हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. 'बाबू' सिनेमात स्मिता तांबे, संजय खापरे, किरण शिंदे, मंदार मांडवकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

Web Title: marathi actress ruchira jadhav father click photo with daughter babu movie poster shared post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.