Video: 'ये लाल इश्क'.. सायली संजीवचा साडीतला हॉट लूक व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 19:35 IST2021-10-26T19:35:00+5:302021-10-26T19:35:00+5:30
Sayali sanjeev: सायलीच्या फोटोला चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींकडूनही पसंती मिळत आहे. अलिकडेच क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने (ruturaj gaikwad) तिच्या फोटोवर कमेंट केली होती.

Video: 'ये लाल इश्क'.. सायली संजीवचा साडीतला हॉट लूक व्हायरल
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सायली संजीव ( sayali sanjeev). उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काच स्थान निर्माण करणारी सायली सध्या तिच्या हटके फोटोशूटसाठी चर्चेत येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती नवनवीन फोटोशूट करत असून त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे. विशेष म्हणजे तिच्या या फोटोला चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींकडूनही पसंती मिळत आहे. अलिकडेच क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने (ruturaj gaikwad) तिच्या फोटोवर कमेंट केली होती. तेव्हापासून या दोघांच्या नात्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, या चर्चांवर अद्यापही सायलीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यातच आता सायलीने आणखीन एक सुंदर व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
सायलीने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने लाल रंगाची साडी नेसली असून ये लाल इश्क या गाण्यावर ती मनमोहक एक्स्प्रेशन्स देताना दिसत आहे.
दरम्यान, सायली गेल्या कित्येक दिवसांपासून इन्स्टाग्रामवर साडीतील काही फोटो, व्हिडीओ पोस्ट करत आहे. विशेष म्हणजे तिची प्रत्येक पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.