मराठी अभिनेत्रीने सांगितला विराट कोहलीसोबत शूटिंगचा अनुभव, म्हणाल्या, "माझ्या मुलीसाठी त्याने..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 15:19 IST2025-04-18T15:19:02+5:302025-04-18T15:19:34+5:30

कोणासाठी इतकं कोण करतं खरंच... अभिनेत्रीने सांगितला किस्सा

marathi actress shubhangi latkar shares her experience of working with virat kohli for ad shoot | मराठी अभिनेत्रीने सांगितला विराट कोहलीसोबत शूटिंगचा अनुभव, म्हणाल्या, "माझ्या मुलीसाठी त्याने..."

मराठी अभिनेत्रीने सांगितला विराट कोहलीसोबत शूटिंगचा अनुभव, म्हणाल्या, "माझ्या मुलीसाठी त्याने..."

अनेक मालिका, सिनेमांमध्ये आईच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेत्री शुभांगी लाटकर (Shubhangi Latkar). 'आशिकी २' मध्ये त्यांनी श्रद्धा कपूरच्या आईची भूमिका साकारली होती. तर नुकत्याच त्या 'घरत गणपती' सिनेमातही दिसल्या. १९९७ पासून त्या इंडस्ट्रीत काम करत आहेत. 'शक्तिमान', 'अधुरी एक कहानी', 'पिंजरा' ते सध्याच्या 'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेतही त्यांनी काम केलं. शुभांगी लाटकर अनेक जाहिरातींमध्येही झळकल्या आहेत. एका जाहिरातीत त्यांनी क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत (Virat Kohli) स्क्रीन शेअर केली. त्याचा किस्सा त्यांनी नुकतंच एका मुलाखतीत सांगितला.

विराट कोहलीचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्याच्यासोबत काम करायला मिळणं तर अनेकांचं स्वप्नच असतं. अभिनेत्री शुभांगी लाटकर यांनाही विराटसोबत एका जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली. क्रिकेटमधलं फारसं कळत नसल्याने त्यांना काही याचं गांभीर्य वाटलं नाही. पण त्यांची मुलगी ऐकून खूश झाली होती. 'बी रेडी ओके'या सोशल मिडिया पेजला दिलेल्या मुलाखतीत शुभांगी लाटकर किस्सा सांगताना म्हणाल्या, "मला फार क्रिकेटबद्दल माहिती नाही. त्यातलं काही कळत नाही. पण जेव्हा मी घरी सांगितलं की मी उद्या विराट कोहलीसोबत जाहिरात करत आहे तेव्हा माझी मुलगी जी काही उत्साहित झाली होती. 'तुला कळतंय का आई तू कोणाबरोबर जाहिरात करतीयेस'. तर म्हटलं हो, माहितीये विराट कोहलीसोबत करत आहे."

"नंतर जाहिरातीच्या शूटवेळी मी विराटला सांगितलं की माझी मुलगी तुझी मोठी चाहती आहे. आणि मी लगेच तेव्हा तिला व्हिडिओ कॉल केला. पण तिने उचलला नाही. मी विराटला म्हटलं, 'ती कॉलेजमध्ये असेल. फोन उचलू शकली नाही'. तर त्याने एक व्हॉईस नोट रेकॉर्ड केला आणि म्हणाला हे तिला पाठवा. 'हॅलो यशोदा, मी विराट, तू माझी चाहती आहेस मला समजलं...' असं त्याने व्यवस्थित तिच्यासाठी संदेश पाठवला. इतका गोड माणूस म्हणजे खरंच कोणासाठी इतकं कोण करतं."

Web Title: marathi actress shubhangi latkar shares her experience of working with virat kohli for ad shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.