Sonalee Kulkarni : मैं झुकेगा नहीं साला..., नवरोबाने सोनालीसाठी घेतला ‘पुष्पा’ स्टाईल उखाणा, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 10:23 AM2022-08-23T10:23:45+5:302022-08-23T10:24:03+5:30

Sonalee Kulkarni : ‘लंडन वेडिंग’चा एक धम्माल व्हिडीओ सोनालीने शेअर केला आहे. या व्हिडीओत सोनालीचा नवरा कुणाल उखाणा घेताना दिसतोय. तो सुद्धा अगदी पुष्पा स्टाईल. त्याच्या उखाण्याची सध्या चांगलीच चर्चा आहे.

marathi actress Sonalee Kulkarni Kunal Benodekar wedding special ukhana- | Sonalee Kulkarni : मैं झुकेगा नहीं साला..., नवरोबाने सोनालीसाठी घेतला ‘पुष्पा’ स्टाईल उखाणा, पाहा व्हिडीओ

Sonalee Kulkarni : मैं झुकेगा नहीं साला..., नवरोबाने सोनालीसाठी घेतला ‘पुष्पा’ स्टाईल उखाणा, पाहा व्हिडीओ

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी  (Sonalee Kulkarni) हिची बातच न्यारी. गेल्या काही दिवसांपासून सोनालीच्या ‘लंडन वेडिंग’ची जोरदार चर्चा आहे. होय, पहिल्यांदा दुबईत आणि नंतर लंडनमध्ये सोनालीने लग्न केलं. दुबईतील लग्न अगदी साधं होतं. पण लंडनच्या वेडिंगचा थाट अगदी शाही होता.

लंडनमध्ये सोनाली व कुणालने विधीवत लग्न केलं. या लग्नाचे फोटो, व्हिडीओ तुम्ही पाहिले असतीलच. प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या विवाह सोहळ्याची तीन भागांची मालिकाही तुम्ही पाहिली असेल. आता या लग्न सोहळ्याचा आणखी एक धम्माल व्हिडीओ सोनालीने शेअर केला आहे. या व्हिडीओत सोनालीचा नवरा कुणाल उखाणा घेताना दिसतोय. तो सुद्धा अगदी पुष्पा स्टाईल. त्याच्या उखाण्याची सध्या चांगलीच चर्चा आहे.

लग्नविधी संपन्न झाल्यानंतर सोनालीचा गृहप्रवेश झाला. सोनाली तांदळाने भरलेला कलश ओलांडून घरात प्रवेश करते. त्यानंतर सर्वजण तिचा नवरा कुणालला  उखाणा घेण्यासाठी सांगतात. त्यानंतर तो सोनालीसाठी खास उखाणा घेतो.
‘ लग्न झालं दणक्यात, लग्नात होता ढोला-बाजा, सोनालीचं नाव घेतो...मैं झुकेगा नहीं साला...,’ असा त्याचा उखाणा ऐकून सगळेच हसू लागतात. सोनाली सुद्धा खळखळून हसते आणि मग कुणालला मस्तपैकी मिठी मारते. 

सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांनी 7 मे 2021 रोजी दुबईत नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. कोरोना महामारीमुळे या लग्नात अगदी कुणाल व सोनालीचे कुटुंबीयही उपस्थित राहू शकले नव्हते.  लग्नाची हौसमौज राहिली होती. त्यामुळे सोनाली व कुणालने पुन्हा एकदा लंडनमध्ये विधिवत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी दोघांनी पुन्हा लगीनगाठ बांधली होती.
 

Web Title: marathi actress Sonalee Kulkarni Kunal Benodekar wedding special ukhana-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.