शाळेच्या गणवेशातील गोबऱ्या गालांच्या या क्यूट गर्लला ओळखलंत? आहे मराठीतील दिग्गज अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 05:45 PM2022-05-31T17:45:23+5:302022-05-31T17:46:32+5:30
Throwback : सेलिब्रिटींचे जुने, बालपणीचे फोटो व्हायरल व्हायला निमित्तं लागत नाही. रोज इंटरनेटवर सेलिब्रिटींचे असे चिक्कार फोटो व्हायरल होतात. आता असाच एक फोटो तुफान व्हायरल होतोय.
सेलिब्रिटींचे जुने, बालपणीचे फोटो व्हायरल व्हायला निमित्तं लागत नाही. इंटरनेटवर सेलिब्रिटींचे असे चिक्कार फोटो रोज व्हायरल होतात. आता असाच एक फोटो तुफान व्हायरल होतोय. शाळेच्या गणवेशातील एका चिमुकलीचा फोटो पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल. हा फोटो एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा आहे.
खरंतर चेहऱ्यावरील हावभाव पाहून ती कोण? याचा तुम्हालाही अंदाज आलाच असणार. पण अद्यापही तुम्ही तिला ओळखलं नसेल तर आम्ही सांगतो.
ही चिमुली दुसरी कुणी नसून अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारी ‘अप्सरा’ आहे. होय, हा मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) बालपणीचा फोटो आहे.
27 मे 2020 रोजी खुद्द सोनालीने हा फोटो शेअर केला होता. ‘होय, ही मी आहे. खूप दिवस झाले हा फोटो मलाच पाठवला जात होता आणि हा फोटो माझाच आहे का असं विचारलं जातं होतं. म्हणून म्हटलं पोस्टच करून टाकूया... तर हा माझा शाळेतला पहिला दिवस...,’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं होतं.
त्याआधीही बालपणीचे अनेक फोटो तिने शेअर केले होते. या फोटोंतील चिमुल्या सोनालीचा क्युटनेस तुम्हाला तिच्या प्रेमात पाडेल. तिचे बोलके डोळे, स्टाईल याची झलक या फोटोत स्पष्टपणे पाहायला मिळते.
सोनाली ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. सोशल मीडियावरही ती प्रचंड अॅक्टिव्ह आहे. तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.सोनाली आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनमुळे सतत चर्चेत असते. सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.
7 मे 2021 रोजी सोनाली कुणाल बेनोडेकरसह लग्नबेडीत अडकली होती. यंदा लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं त्यादिवशी पुन्हा एकदा तिने कुणालसोबत विधीवत लग्न केलं होतं. मागील वर्षी दुबईतील एका मंदिरात सोनाली व कुणाल लग्नबंधनात अडकले होते. कोरोना महामारीमुळे या लग्नाला दोघांचेही आई-वडील उपस्थित नव्हते. त्यानंतर या वर्षी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला त्यांनी पुन्हा एकदा लग्न केलं. हा लग्नसोहळा लंडन येथे काही मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडला. या लग्नाला तिची मैत्रीण अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिनेदेखील हजेरी लावली होती.