"काय झालं,कसं झालं...", वाचा अप्सरा सोनाली कुलकर्णीच्या एका लग्नाची दुसरी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 05:43 PM2022-05-12T17:43:39+5:302022-05-12T19:18:18+5:30

मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही पुन्हा विवाहबंधनात अडकली आहे. चार दिवस उलटूनही तिच्या लग्नाचे फोटो समोर न आल्यानं चाहते थोडे नाराज झाले.

Marathi actress Sonalee Kulkarni wrote a special note for her fans, post viral | "काय झालं,कसं झालं...", वाचा अप्सरा सोनाली कुलकर्णीच्या एका लग्नाची दुसरी गोष्ट

"काय झालं,कसं झालं...", वाचा अप्सरा सोनाली कुलकर्णीच्या एका लग्नाची दुसरी गोष्ट

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही पुन्हा विवाहबंधनात अडकली आहे. तिने तिचा पती कुणाल बेनोडेकर पुन्हा लगीनगाठ बांधली आहे. सोनालीचा मेहंदी सेरेमनी आणि व्हाईट वेडिंगचा फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांची तिच्या लग्नाबद्दलची उस्तुकता  आणखी वाढली. पण चार दिवस उलटूनही तिच्या लग्नाचे फोटो समोर न आल्यानं चाहते थोडे नाराज झाले. चाहत्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी सोनालीने एक खास पोस्ट शेअर केली आहे...

यात तिनं म्हटलय की, pandemic मुळे दोन वेळा postpone करून तिसऱ्यांदा cancel करावा लागला आमचा लग्न सोहळा.मग दुबईत अडकल्यामुळे किमान आता register marriage करून टाकू असं ठरवलं.आमच्या आई वडील, कुटुंबियांना travel करता नाही आलं.

Zoom call वरून साक्षीदार झाले.पुढे जेव्हा परिस्थती सुधारेल तेव्हा सगळे एकत्र येऊ आणि celebrate करू अश्या आशेवर, गेल्या वर्षी ७.०५.२०२१ ला आम्ही court marriage केलं.यंदा, आमच्या पहिल्या wedding anniversary ला आम्ही सह कुटुंब - सह परिवार - ठरल्या प्रमाणे - संपूर्ण विधीपूर्वक - मराठमोळ्या पद्धतीने - अगदी स्वप्नवत - लग्न केलं.काय काय झालं, कसं झालं, कुठे झालं, सगळं - सगळं share करू लवकरच...तुमचा आशिर्वाद आणि प्रेम नेहमी प्रमाणे राहू द्या... तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होतोय...

Web Title: Marathi actress Sonalee Kulkarni wrote a special note for her fans, post viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.