मला अभिमान आहे माझ्या बाबांचा..! कारगील युद्धात सोनाली कुलकर्णीचे वडीलही होते सैन्यदलात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 02:47 PM2022-07-26T14:47:07+5:302022-07-26T14:53:45+5:30
Sonalee Kulkarni: मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णींं(sonalee kulkarni)ने कारगिल विजय दिवसानिमत्त सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
कारगील युद्धांच्या आठवणींना आज २३ वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी म्हणजे 26 जुलै 1999 साली भारतीय सैन्याने कारगीलमध्ये बर्फाळ जमिनीवर तिरंगा फडकवत पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली होती. पाकिस्तानच्या कूटनितीला भारतीय सैन्यांतील बहादूर जवानांनी आपल्या बलिदानाने उत्तर दिले. तब्बल अडीच महिने सुरू राहिलेल्या या युद्धात 527 जवानांना वीरमरण आले होते. या जवानांच्या बलिदानाची आठवण म्हणून 26 जुलै हा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो.
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णींं(sonalee kulkarni)ने कारगिल विजय दिवसानिमत्त सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत एक फोटोदेखील तिने शेअर केला आहे. आज #कारगिल_विजय_दिवस. मला अभिमान आहे माझ्या बाबांचा आणि त्या सर्व सैनिक बांधवांचा ज्यांच्या पराक्रमामुळे आपण हा दिवस साजरा करत आहोत. या फोटोत दिसणाऱ्या तीन जवानांपैकी मधले सोनालीचे वडील आहेत. सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर असून त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात 30 वर्षे काम केल आहे. त्यामुळे सोनालीचे प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालयात झाले असून माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालयात झाले आहे.सोनाली अनेकवेळा कुटुंबीयांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni). उत्तम अभिनय कौशल्य आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री आज अप्सरा म्हणूनही ओळखली जाते. सध्या सोनाली तिच्या तमाशा लाईव्ह या चित्रपटामुळे चर्चेत येत आहे. अलीकडेच तिचा हा सिनेमा रिलीज झाला आहे.
---