मराठी अभिनेत्री सोनाली खरेची लेक करतेय अभिनय क्षेत्रात पदार्पण, जाणून घ्या याबद्दल

By तेजल गावडे | Published: November 3, 2020 07:27 PM2020-11-03T19:27:22+5:302020-11-03T19:28:06+5:30

सोनाली खरेची मुलगी सनाया अभिनय क्षेत्रात पदार्पण करते आहे.

Marathi actress Sonali Khare's daughter making her debut in the field of acting | मराठी अभिनेत्री सोनाली खरेची लेक करतेय अभिनय क्षेत्रात पदार्पण, जाणून घ्या याबद्दल

मराठी अभिनेत्री सोनाली खरेची लेक करतेय अभिनय क्षेत्रात पदार्पण, जाणून घ्या याबद्दल

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे हिने चित्रपट, मालिका व नाटक अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. सोनाली तिच्या आगामी प्रोजेक्ट्स व सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते. तसेच बऱ्याचदा सोनाली तिची लेक सनायासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यातून समजते आहे की सनाया लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करते आहे.

सोनाली खरे हिने इंस्टाग्रामवर सनायाचा एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, लवकरच...या दिवाळीत भेटीला येणार ब्लड रिलेशन.


या पोस्टमधून समजते आहे की सोनाली खरेची मुलगी सनाया अभिनय क्षेत्रात पदार्पण करते आहे. ती ब्लड रिलेशन या लघुपटात झळकणार आहे. या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सई देवधरने केले आहे. तर निर्मिती पर्पल मॉर्निंग मुव्हिजने केली आहे. 


सोनाली खरेचे चाहते तिच्या मुलीला अभिनय क्षेत्रात काम करताना पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. तसेच नुकतेच सोनालीने दसऱ्याच्या मुहूर्तावर तब्बल ८ वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आज काय स्पेशल’ ह्या कुकिंगविषयक शोमध्ये सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत ती दिसणार आहे.


सोनाली शेवटची हृद्यांतर चित्रपटात झळकली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता ती बाहुबली चित्रपटावर आधारीत वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये काम करण्यासाठी ती खूपच उत्सुक आहे. यात ती पारंपारिक वेशात दिसणार आहे.

Web Title: Marathi actress Sonali Khare's daughter making her debut in the field of acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.