सोनाली कुलकर्णीला फिल्म इंडस्ट्रीतली 'ही' गोष्ट अजिबात आवडत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 01:49 PM2024-03-17T13:49:43+5:302024-03-17T13:56:30+5:30
सोनाली कुलकर्णी झी चित्र गौरव 2024 मध्ये सहभागी झाली होती.
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक ओळखीचा चेहरा आहे. सोनालीने आज स्वतःचं वेगळं असं एक स्थान निर्माण केलंय. तिचा अफाट चाहतावर्ग आहे. नुकतेच तिने 'झी मराठी चित्र गौरव' पुरस्कार सोहळ्याला खास उपस्थिती लावली होती. पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकांना सोनालीचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला. यावेळी सोनालीनं इंडस्ट्रीतील अजिबात आवडत नसलेल्या गोष्टींचा खुलासा केला.
मराठी मनोरंजनसृष्टीत उत्तम कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा 'झी मराठी चित्र गौरव' पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात आला. सोनाली कुलकर्णी झी चित्र गौरव 2024 मध्ये सहभागी झाली होती. यावेळी सोनाली कुलकर्णी खास लूकमध्ये पाहायला मिळाली. सोनालीनं मीडियाशी बोलताना विविध गोष्टींवर भाष्य केलं. यावेळी ती म्हणाली, 'या प्रोफेशनमधील सर्वांत कंटाळवाणी गोष्ट म्हणजे मेकअप करणं. मला मेकअप करायचा खूप कंटाळा येतो. मला शक्य झालं असतं तर मी मेकअप न करताच पायजमा टीशर्टवर रेड कार्पेटवर आले असते.असं अनेकजण करतात देखील. मलाही तसे करायला आवडेल'.
सोनाली कुलकर्णी ही मराठी चित्रपटसृष्टीतली एक गुणी अभिनेत्री आहे. आत्तापर्यंत तिने हिरकणी, मितवा, धुरळा, तमाशा लाईव्ह यांसारख्या अनेक चित्रपटांमधून काम करत रसिकांची मनं जिंकली आहेत. सोनालीला महाराष्ट्राची अप्सरा अशी ओळख मिळाली आहे ती अप्सरा आली या गाण्यामुळे. नुकतेच सोनाली दाक्षिणात्य चित्रपटात दिसली आहे. तर आता लवकरच ती 'मोगल मर्दिनी ताराराणी' या चित्रपटात झळकणार आहे.