'काल त्या शब्दांची माणसं होताना पाहिली..'; स्पृहाने शेअर केला वारीतील अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 03:45 PM2022-06-29T15:45:25+5:302022-06-29T15:46:03+5:30
Spruha joshi: स्पृहा अलिकडेच पुण्यातील आषाढी वारीमध्ये सहभागी झाली होती. या वारीत सहभागी झाल्यानंतर तेथे आलेल्या अनुभवांचं वर्णन तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे.
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मागील २ वर्ष पंढरपूर वारीमध्ये खंड ( Pandharpur Vari) पडला होता. मात्र, आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असून संपूर्ण महाराष्ट्र हरीनामाच्या गजरात दुमदुमून गेला आहे. सध्या वारकरी मोठ्या भक्तीभावाने हळूहळू पंढरपुरात दाखल होत आहेत. या वारीमध्ये अनेक मराठी कलाकारांनीही हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच आता अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) हिने वारीत सहभाग घेत येथील वारकऱ्यांसोबतच आलेल्या अद्भुत अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.
स्पृहा अलिकडेच पुण्यातील आषाढी वारीमध्ये सहभागी झाली होती. या वारीत सहभागी झाल्यानंतर तेथे आलेल्या अनुभवांचं वर्णन तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे. स्पृहाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये तिचं अनुभवकथन केलं आहे.
"आयुष्यात पहिल्यांदाच वारीचं, पालखीचं वातावरण अनुभवायची संधी मिळाली.. पूर्ण वेळ मी आसपासचे हरीभक्तीत लीन झालेले चेहरे नुसती बघत राहिले होते.. ओढ, समर्पण, असोशी, तळमळ.. सगळे कागदावरचे शब्द.. काल त्या शब्दांची माणसं होताना पाहिली.. पांडुरंग हरी", अशी पोस्ट स्पृहाने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
दरम्यान, स्पृहाची ही पोस्ट सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. स्पृहा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून एक उत्तम कवयित्रीदेखील आहे. त्यामुळे तिची सोशल मीडियावर वरचेवर चर्चा रंगत असते.