"गणपती बाप्पासमोर आता आला बाबुराव हे गाणं ऐकलं आणि...", मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 12:19 PM2023-09-21T12:19:58+5:302023-09-21T12:22:10+5:30

गणपतीसमोर विचित्र गाणी वाजवण्यावरुन प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, व्यक्त केला संताप 

marathi actress surabhi bhave post on ganpati songs gets angry after listening aala baburao | "गणपती बाप्पासमोर आता आला बाबुराव हे गाणं ऐकलं आणि...", मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

"गणपती बाप्पासमोर आता आला बाबुराव हे गाणं ऐकलं आणि...", मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

googlenewsNext

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटींनीही मोठ्या जल्लोषात गणरायाचं आगमन केलं. दरवर्षाप्रमाणे यंदाही बॉलिवूड आणि मराठी कलाकारांच्या घरी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी गणरायाच्या गाण्याचे बोल कानावर पडत आहेत.पण, गणपतीसमोर विचित्र गाणी वाजवण्यावरुन प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने पोस्ट केली आहे. 

अभिनेत्री सुरभी भावेने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'स्वामिनी' या लोकप्रिय मालिकेतून ती घराघरात पोहोचली. सुरभी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबद्दल ती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती देत असते. सध्या सुरभीने केलेल्या अशाच एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टमध्ये सुरभीने गणपतीत बाप्पासमोर वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांवरुन संताप व्यक्त केला आहे. 

"गणपती बाप्पा समोर आत्ता "आला बाबुराव" हे गाणं ऐकलं आणि माझ्यातली भक्त जागी होण्याआधीच लोप पावली...का हे गाणं वाजवावं वाटलं असेल ?? गाण्याचा आणि बाप्पाचा काय संबंध?" असं सुरभीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनीही संतप्त कमेंट केल्या आहेत. 

सध्या सुरभी 'राणी मी होणार' या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याआधी ती 'भाग्य दिले तू मला' आणि '३६ गुणी जोडी' या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. 

Web Title: marathi actress surabhi bhave post on ganpati songs gets angry after listening aala baburao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.