Tejaswini Pandit : नागराज मंजुळेही आकाश ठोसरला..., मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीवर बोलली तेजस्विनी पंडित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 12:59 PM2022-12-21T12:59:21+5:302022-12-21T13:00:01+5:30

Tejaswini Pandit : बॉलिवूडमध्ये घराणेशाही आहे, गजबाजी आहे, हे सगळ्यांना ठाऊक आहे. मराठी चित्रपटसृष्टीही याला अपवाद नाही. याच मुद्यावर तेजस्विनी बोलली...

marathi Actress Tejaswini Pandit talk on Marathi film Industry Nepotism | Tejaswini Pandit : नागराज मंजुळेही आकाश ठोसरला..., मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीवर बोलली तेजस्विनी पंडित

Tejaswini Pandit : नागराज मंजुळेही आकाश ठोसरला..., मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीवर बोलली तेजस्विनी पंडित

googlenewsNext

मराठीतील सुंदर आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit ) हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. आपल्या दमदार अभिनयानं तिने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. चित्रपटांपासून वेबसीरिजपर्यंत सर्वच क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आईच्या पावलावर पाऊल टाकत तेजस्विनी अभिनयाच्या दुनियेत आली आणि इथेच रमली. तेजस्विनीने आता निर्मीती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सध्या तेजस्विनी ‘अथांग’ या गाजत असलेल्या मराठी वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. याच सीरिजच्या निमित्ताने  तेजस्विनीने अनेक खुलासे केले आहेत.

सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्ट मुलाखतीत तेजस्विनी भरभरून बोलली. अगदी तिच्या करिअरपासून यादरम्यान तिला आलेल्या बऱ्या वाईट अनुभवांबद्दलही तिने खुलासा केला. याच मुलाखतीत ती मराठी सिनेसृष्टीतील गटबाजीबद्दलही बोलली.
बॉलिवूडमध्ये घराणेशाही आहे, गजबाजी आहे, हे सगळ्यांना ठाऊक आहे. मराठी चित्रपटसृष्टीही याला अपवाद नाही. आता मराठी इंडस्ट्रीतही गटबाजी प्रकार फोफावतो आहे. याच मुद्यावर तेजस्विनी बोलली आणि बोलता बोलता नागराज मंजुळे आणि आकाश ठोसरपर्यंत आली.

काय म्हणाली तेजस्विनी...
अलीकडच्या काळात मी फक्त काही ठराविक लोकांसोबतच काम करतेय, अशी टीका माझ्यावर होते आहे.  तीच टीम, तेच कलाकार असं समीकरणच बनलं आहे. मी फक्त संजय जाधव यांच्याबरोबरच काम करते अशा चर्चाही  काही दिवसांपूर्वी सुरु होत्या. पण मला यात काही गैर वाटत नाही. दिग्दर्शकाला काही ठरलेल्या कलाकारांसोबत काम करणं सोपं जातं, असं ती म्हणाली.मराठी सिनेसृष्टीतही गटबाजी आहे का? असा प्रश्न तिला विचारला गेला. यावर ती म्हणाली,  नागराज मंजुळेहीआकाश ठोसरला त्याच्या चित्रपटांमध्ये घेतोच की... असं काही नाही की फक्त संजय जाधवच कंपूशाही करतात. प्रत्येकाचा वेगळा ग्रुप आहे. 

‘अथांग’ या वेबसीरिजबद्दल सांगायचं तर  प्लॅनेट मराठी ओटीटीवर जयंत पवार दिग्दर्शित  ही  सीरिज प्रदर्शित झाली आहे. यात संदीप खरे, निवेदिता जोशी सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर यांच्या प्रमुख भूमिका आहे.  तेजस्विनीने  ‘अथांग’ वेबसीरिजची निर्मिती केली आहे.  

Web Title: marathi Actress Tejaswini Pandit talk on Marathi film Industry Nepotism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.