टीआरपीच्या शर्यतीत 'माझी तुझी रेशीमगाठ' 'ची मालिकेची पिछेहाट, तर ही मालिका ठरली 'नंबर १'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 12:35 PM2022-01-04T12:35:09+5:302022-01-04T12:39:02+5:30

मालिकांच्या टीआरपीवरून ( TRP ratings) मालिकेची लोकप्रियता ठरते. साहजिकच टीआरपीच्या शर्यतीत सतत अव्वल राहण्यासाठी मालिकांमध्ये नवनवे ट्वीस्ट येत राहतात.

Marathi bigg boss marathi 3 number one in trip aai kuthe kay karte 2nd rank | टीआरपीच्या शर्यतीत 'माझी तुझी रेशीमगाठ' 'ची मालिकेची पिछेहाट, तर ही मालिका ठरली 'नंबर १'

टीआरपीच्या शर्यतीत 'माझी तुझी रेशीमगाठ' 'ची मालिकेची पिछेहाट, तर ही मालिका ठरली 'नंबर १'

googlenewsNext

मालिकांच्या टीआरपीवरून ( TRP ratings) मालिकेची लोकप्रियता ठरते. साहजिकच टीआरपीच्या शर्यतीत सतत अव्वल राहण्यासाठी मालिकांमध्ये नवनवे ट्वीस्ट येत राहतात. काही अनपेक्षित वळणं प्रेक्षकांना आवडतात तर काहींना प्रेक्षक लगेच कंटाळतात. तूर्तास चर्चा आहे ती या आठवड्यातील टीआरपी यादीतील टॉप 10 मालिकांची. तर या आठवड्यात सातत्याने टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल असणारी ‘आई कुठे काय करते’ नंबर 1 वरून नंबर 2वर गेलीये.

गेल्या काही आठवड्यांपासून ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte Serial) मालिका टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल होती, मात्र आता ‘आई कुठे काय करते’ मागे टाकत मराठी '. बिग बॉस मराठी 3 ' या कर्लसवरील शोने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

दुस-या क्रमांकावर ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आहे. झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका टीआरपी यादीत तिस-या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर प्रवाहवरील 'रंग माझा वेगळा' ही स्टार प्रवाहवरील मालिका आहे. तर पाचव्या क्रमांक 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेनं पटकावला आहे.

'देवमाणूस 2', 'सुख म्हणजे नक्की काय असतं', स्वाभिमान  या अनुक्रमे सहाव्या, सातव्या व आठव्या क्रमांकावर आहेत. तर 'फुलाला सुगंध मा तीचा' ही मालिका  टीआरपी यादीत नवव्या क्रमांकावर आहे. तर येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका दहाव्या स्थानी आहे. काही दिवसांपूर्वी  'बिग बॉस मराठी 3'शो चा ग्रँड फिनाले पार पडला. 

Web Title: Marathi bigg boss marathi 3 number one in trip aai kuthe kay karte 2nd rank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.