जावई माझा भला! अविनाश नारकरांची सासऱ्यांसाठी खास पोस्ट; कॅप्शनने वेधलं लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 03:53 PM2024-08-31T15:53:16+5:302024-08-31T15:55:58+5:30

अविनाश नारकर हे मराठी मनोरंजन विश्वातील नावाजलेले अभिनेते आहेत.

marathi cinema actor avinash narkar share special post on social media for his father in law  | जावई माझा भला! अविनाश नारकरांची सासऱ्यांसाठी खास पोस्ट; कॅप्शनने वेधलं लक्ष 

जावई माझा भला! अविनाश नारकरांची सासऱ्यांसाठी खास पोस्ट; कॅप्शनने वेधलं लक्ष 

Avinash Narkar : अविनाश नारकर हे मराठी मनोरंजन विश्वातील नावाजलेले अभिनेते आहेत. गेली अनेक वर्षे ते अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. केवळ अभिनयच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच लक्ष वेधून घेत असतात. सोशल मीडियावर त्यांचा दांडगा वावर आहे. पत्नी ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर त्यांच्या रील व्हिडीओमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत येतात. अनेकदा त्यांना नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. आता त्यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या सासऱ्यांसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. ज्याचं  नेटकरी कौतुक करत आहेत.


उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारे अविनाश नारकर सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय आहेत. नुकतीच त्यांनी स्वत: च्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या सासऱ्यांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहलंय, "ज्यांनी माझं अख्खं आयुष्य... माझं संपूर्ण जगणं सर्वार्थाने ऐश्वर्यसंपन्न केलं. त्या माझ्या या सासरे बुवांचे, निर्मळ मनाच्या बाबांचे उपकार मी साता जन्मात फेडू शकणार नाही". 

या पोस्टमध्ये अविनाश नारकरांनी आपल्या सासऱ्यांच तोंडभरून कौतुक केलं आहे. बॅकग्राउंडला 'विठू माऊली तू माऊली जगाची' हे गाणं ऐकायला मिळतंय. 

दरम्यान, अविनाश नारकर 'डंका' या सिनेमात दिसले .१९ जुलैला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबतच अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, किरण गायकवाज, सयाजी शिंदे तसेच रसिका सुनील, अक्षया गुरव हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. 

Web Title: marathi cinema actor avinash narkar share special post on social media for his father in law 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.