Mr. & Mrs. Parab : आंबा, नारळाची बाग अन् मनमोहक वातावरण; प्रतिजाचं रोमँटिक फोटोशूट पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 03:52 PM2024-09-24T15:52:40+5:302024-09-24T15:58:50+5:30

मराठी सिनेसृष्टीत कमी वयात नाव कमावलेल्या अभिनेत्यांपैकी प्रथमेश परब हा एक आहे. 'टाइमपास' चित्रपटातून त्याला खरी ओळख मिळाली.

नुकतंच प्रथमेश परबने त्याच्या बायकोसोबत रोमॅंटिक फोटोशूट केलं आहे. त्यांच्या या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

प्रथमेश परब सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय आहे. त्याद्वारे अभिनेता त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट चाहत्यांना देत असतो.

नुकतेच त्याने स्वत: च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो खास फोटो पोस्ट केलेत.

आजुबाजूला आंबा नारळाची बाग तसेच मनमोहक वातावरणात हे जोडपं पावसात भिजण्यात आनंद लूटताना दिसत आहे.

फोटोंमध्ये प्रथमेशने पिवळ्या रंगाचा शर्ट तर सफेद पॅन्ट घातली आहे. तर क्षितीजाने पिवळा फ्लोरल प्रिंट जम्पसूट घातलाय.

प्रतिजाचे हे व्हायरल फोटो नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहेत.

क्षितीजा घोसाळकरसोबत २४ फेब्रुवारी रोजी त्याने आयुष्यभराची गाठ बांधली.

प्रथमेश आणि क्षितीजा बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते.