Navratri 2024 : प्रतिजाचं नवरात्रोत्सवानिमित्त खास फोटोशूट; पारंपरिक लूक ठरतोय लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 05:55 PM2024-10-08T17:55:54+5:302024-10-08T18:07:26+5:30

नुकतंच प्रथमेश परबने पत्नीसह नवरात्रोत्सव स्पेशल खास फोटोशूट केलं आहे.

मराठमोळा अभिनेता प्रथमेश परब सध्या 'ताजा खबर या वेब सीरिजमुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. अशातच अभिनेत्याने पत्नीसह नवरात्रोत्सव स्पेशल खास फोटोशूट केलं आहे.

हे जोडपं कायमच त्यांच्या हटके स्टाईलने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं.

सध्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी पारंपरिक वेभूषेला प्राधान्य देत काही फोटोज क्लिक केले आहेत.

प्रथमेश-क्षितीजाचा हा अंदाज नेटकऱ्यांना भावला आहे.

आज नवरात्रीच्या सहाव्या दिवशी प्रथमेशने लाल रंगाचा कुर्ता तर क्षिताजाने नऊवारी नेसली आहे.

"तुझ संग बैर लगाया ऐसा, रहा ना मैं फिर अपने जैसा..." असं कॅप्शन देत अभिनेत्याने त्यांचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

'टाइमपास' सिनेमात मुख्य भूमिका साकारत प्रथमेशने अभिनयाची छाप पाडली. या सिनेमात त्याने साकारलेलं दगडू हे पात्र प्रेक्षकांच्या भलतंच पसंतीस उतरलं होतं.

सध्या प्रथमेश हिंदीतही आपल्या अभिनयाची जादू दाखवत आहे.