"केसरियो रंग तने लाग्यो रे...", स्वप्नील जोशीने गरब्याच्या गाण्यावर धरला ठेका; व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 03:10 PM2024-10-10T15:10:06+5:302024-10-10T15:14:20+5:30

सध्या देशभरात नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे.

marathi cinema actor swapnil joshi dance on garba song in nagpur video viral on social media | "केसरियो रंग तने लाग्यो रे...", स्वप्नील जोशीने गरब्याच्या गाण्यावर धरला ठेका; व्हिडीओ व्हायरल 

"केसरियो रंग तने लाग्यो रे...", स्वप्नील जोशीने गरब्याच्या गाण्यावर धरला ठेका; व्हिडीओ व्हायरल 

Swapnil Joshi : सध्या देशभरात नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. या उत्सावामध्ये तरुण मंडळींना वेध लागते ते गरबा आणि दांडीयाचे. मोठमोठे लॉन किंवा मैदानांवर रंगणारे गरब्याचे कार्यक्रम म्हणजे तरुणांचा सळसळता उत्साह असतो. त्यात कलाकार मंडळीही कुठे कमी पडत नाही. अनेक कलाकार नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या वेशभूषा करून कार्यक्रमस्थळी भेट देताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीने (Swapnil Joshi ) नागपुरातील एका नवरात्रोत्सवात हजेरी लावली.


दरम्यान, स्वप्नील जोशीचा गरबा खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता बेभान होऊन गरबा नृत्य करतो आहे. त्याच्यासोबत काही चाहत्यांनीही ठेका धरलाय. पांढरा कुर्ता, डोळ्यांना गॉगल अशा लूकमध्ये स्वप्नील पाहायला मिळतोय. त्याचा हा पारंपरिक अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. शिवाय त्याचं नागपुरात जंगी स्वागतही करण्यात आलं. या व्हायरल व्हिडीओमध्ये स्वप्नीलची एनर्जी आणि डान्स पाहून चाहत्यांनी त्याचं कौतुक केलंय. व्हिडीओमध्ये अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी नागपुरकरांना तोबा गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय.

स्वप्नील जोशीने उत्तम अभिनय आणि पर्सनालिटी यांच्या जोरावर कलाविश्वात त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारा स्वप्नील कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक पोस्टची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत असते.

Web Title: marathi cinema actor swapnil joshi dance on garba song in nagpur video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.