आजीबाई Rocks! १०५ वर्षीय आजींनी सिनेमागृहात जाऊन पाहिला ‘बाईपण भारी देवा’, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 12:01 PM2023-07-29T12:01:16+5:302023-07-29T12:03:19+5:30

१०५ वर्षीय आजीबाईंनी पाहिला ‘बाईपण भारी देवा’, केदार शिंदे व्हिडिओ शेअर करत म्हणाले...

105 years old women watched baipan bhari deva in theatre kedar shinde shared video | आजीबाई Rocks! १०५ वर्षीय आजींनी सिनेमागृहात जाऊन पाहिला ‘बाईपण भारी देवा’, म्हणाल्या...

आजीबाई Rocks! १०५ वर्षीय आजींनी सिनेमागृहात जाऊन पाहिला ‘बाईपण भारी देवा’, म्हणाल्या...

googlenewsNext

बहुचर्चित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. ३० जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची जादू महिन्याभरानंतरही कायम आहे. खासकरुन महिला वर्ग हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांत गर्दी करत आहेत. आता १०५ वर्षीय आजीबाईंनीही चित्रपटगृहांत जाऊन ‘बाईपण भारी देवा’ पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर आजीबाईंनी प्रतिक्रियाही दिली आहे.

केदार शिंदेंनी आजींचा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. “मला चित्रपट खूप आवडला. तुम्ही खूप मोठे व्हा आणि असेच पुढे जा, हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे,” असं आजीबाई व्हिडिओत बोलत आहेत. १०५ वर्षीय आजींचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर केदार शिंदे भारावून गेले आहेत. त्यांनी व्हिडिओ शेअर करत आजीबाईंचे आभार मानले आहेत. “आणखीन काय हवंय आयुष्यात? वय वर्षे १०५...थिएटरमध्ये येऊन सिनेमा पाहिला आणि त्याची प्रतिक्रिया सुध्दा कळवली. आजी ROCKS”, असं केदार शिंदेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

संजय दत्तच्या खरंच ३०८ गर्लफ्रेंड होत्या? ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीसाठी आजारी पत्नीकडेही केलेलं दुर्लक्ष

दरम्यान केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात सहा बहि‍णींची अनोखी गोष्ट सांगण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सामान्य महिलांच्या आयुष्यातील अनेक पैलू दाखविण्यात आले आहेत. रोहिणी हट्टांगडी, दीप परब, सुकन्या मोने, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर आणि सुचित्रा बांदेकर या अभिनेत्री चित्रपटात काकडे सिस्टर्सच्या भूमिकेत आहेत. ‘बाईपण भारी देवा’ बॉक्स ऑफिसवरही सुसाट आहे. या चित्रपटाने २४ दिवसांत तब्बल ६५ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

Web Title: 105 years old women watched baipan bhari deva in theatre kedar shinde shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.