असा पार पडला 'अनन्या'चा २५ वा रौप्य महोत्सवी प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 04:18 AM2018-01-15T04:18:06+5:302018-01-15T09:48:06+5:30
सुयोग निर्मित "अनन्या" नाटकाचा २५ वा रौप्य महोत्सवी प्रयोग आज दीनानाथ नाट्यगृहात सादर करण्यात आला.या वेळी नाटकाचे लेखक दिग्दर्शक ...
स योग निर्मित "अनन्या" नाटकाचा २५ वा रौप्य महोत्सवी प्रयोग आज दीनानाथ नाट्यगृहात सादर करण्यात आला.या वेळी नाटकाचे लेखक दिग्दर्शक प्रताप फड,निर्माते राजेश पाटील,श्रीमती कांचन, सुधीर भट, प्रताप फड उपस्थित होते.'अनन्या' हे कौटुंबिक नाटक असून नायिकेच्या आपघातानंतर तिचं आयुष्य कशाप्रकारे कलाटणी घेतं यावर हे नाटक आधारित आहे.यानंतर जीवनातील वास्तविकता, तिची नोकरी मिळविण्याची जिद्द आणि वडिलांची असलेली माया या सगळ्यांची घालमेल सहन करत नायिका जिद्दीने आपला जीवनाचा प्रवास करते. ही तरुणी आयुष्याच्या वळणावर उभ्या ठाकलेल्या संकटाला जिद्दीने तोंड देत परिस्थितीला सामोरे जाते.मनात असेल तर काहीही अशक्य नाही याचे मूर्तिमंत उदहारण या नाटकात रसिकांना पाहायला मिळते.या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन प्रताप फड यांनी अतिशय उत्तम रीत्या केले आहे.तरुण कलावंतांची सक्षम टीम 'अनन्या'ला लाभली आहे.ऋतुजा बागवे हीने तिचं उल्हसित होणं,खचणं,भरारी घेणं,आत्मविश्वास मिळवत उभं राहणं या आवश्यक असलेले आवाजातले बदल,शब्दफेक,नजरेचा वापर संयमाने केला आहे. त्यामुळे अनन्याच्या भूमिकेला ऋतुजाने योग्य न्याय दिला आहे.तसेच प्रमोद पवार यांनी बाबांची भूमिका साकारताना संवेदनशीलतेच बघताक्षणीच प्रत्यय येतो.संदेश बेंद्रे यांचे प्रसन्न नेपथ्य नाटकाला सौंदर्य बहाल करते.या नाटकाचे कलाकार प्रमोद पवार, विशाल मोरे, अनघा भगरे, अजिंक्य ननावरे, सिद्धार्थ बोडके आणि ऋतुजा बागवे आहेत.प्रताप फड या युवा लेखक व दिग्दर्शक काही वर्षांपूर्वी "अनन्या" ही एकांकिका स्पर्धेतून सादर केली होती.त्यावेळी ती प्रचंड गाजली त्यामुळे या एकांकिकेवरून नाटक बनवताना लेखक म्हणून त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती ती यांनी खूप चांगल्या प्रकारे पार पडली आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'नांदा सौख्य भरे'मालिकेत ऋतुजा बागवेने मुख्य भूमिका साकारली होती.अल्पावधीतच या मालिकेला रसिकांची पसंती मिळाली. इतकेच नाहीतर मालिकेतील प्रत्येक कलाकारांच्या भूमिकेलाही रसिकांनी खूप पसंती दिली.छोटा पडदा गाजवल्यानंतर ऋतुजा बागवे रंगभूमीवर अनन्या बनत रसिकांच्या भेटीला आली असून नाटकाच्या माध्यमातून रसिकांची मनोरंजन करण्यात ती यशस्वी ठरली आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'नांदा सौख्य भरे'मालिकेत ऋतुजा बागवेने मुख्य भूमिका साकारली होती.अल्पावधीतच या मालिकेला रसिकांची पसंती मिळाली. इतकेच नाहीतर मालिकेतील प्रत्येक कलाकारांच्या भूमिकेलाही रसिकांनी खूप पसंती दिली.छोटा पडदा गाजवल्यानंतर ऋतुजा बागवे रंगभूमीवर अनन्या बनत रसिकांच्या भेटीला आली असून नाटकाच्या माध्यमातून रसिकांची मनोरंजन करण्यात ती यशस्वी ठरली आहे.