मनोरंजन विश्वात कॅास्च्युम्सची ४०-५० कोटी रुपयांची उलाढाल; मुंबईपासून सूरतपर्यंत पसरलेय कपडेपटांचे मार्केट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 01:35 PM2022-05-23T13:35:55+5:302022-05-23T13:39:22+5:30
मुंबईतील विविध भागांमध्ये पसरलेल्या कॅासच्युमच्या मार्केटची व्याप्ती थेट गुजरातमधील सूरतपर्यंत पसरलेली आहे.
संजय घावरे
मनोरंजन विश्वात महत्त्वाचे असणाऱ्या कपडेपट म्हणजेच कॅास्च्युम्सची रंगीबेरंगी दुनिया खूप मोठी आहे. मागणीनुसार पुरवठा करणाऱ्या या मार्केटमध्ये वर्षाकाठी ४० ते ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल होते. मुंबईतील विविध भागांमध्ये पसरलेल्या कॅासच्युमच्या मार्केटची व्याप्ती थेट गुजरातमधील सूरतपर्यंत पसरलेली आहे. कॅास्च्युम्सच्या या दुनियेचा कारभार नक्की चालतो तरी कसा आणि एखादी कलाकृती तयार झाल्यानंतर कलाकारांनी वापरलेल्या कॅास्च्युम्सचं होते तरी काय असे बरेच प्रश्न सर्वसामान्य प्रेक्षकांना नेहमी पडतात.
कोणत्याही कलाकृतीमधील कलाकारांसाठी कपडे तयार करण्यापूर्वी कॅास्च्युम डिझाइनरला सर्वप्रथम डायलॅाग्जसह स्टोरी ऐकवली जाते. दिग्दर्शकासोबत चर्चा करून स्टोरीचा काळ जाणून घेतला जातो. त्यावर फॅशन ट्रेंड ठरवला जातो. गोष्ट कुठे घडते, हे पाहिले जाते. स्टोरी किती दिवसांमध्ये पूर्ण होणार हे देखील महत्त्वाचे असते. कारण कंटीन्यूटी हा फॅक्टर चित्रपटांमध्ये गरजेचा असतो. सायकॅालॅाजीकल, साशॅलॉजिकल, इन्व्हायरमेंटल कंडीशन्सचाही विचार केला जातो. कॅरेक्टरचे इन्कम आणि पार्श्वभूमीवरही कॅास्च्युम ठरते. गरीब-श्रीमंत, आधुनिक-ऐतिहासिक, पौराणिक-मध्यमयुगीन, शहरी-ग्रामीण अशा विविध वर्गवारीमध्ये कॅास्च्युम्स विभागले जातात.
कॅरेक्टर्ससाठी काही कपडे तयार मिळतात, पण बरेचसे ट्रेंडनुसार किंवा गरजेनुसार तयार केले जातात. लग्नात किंवा एखाद्या कार्यक्रमात नवीन कपडे चातले जातात, पण घरगुती सीन्ससाठी नवीन कपडे घेऊन धुवावे लागतात. गावाकडच्या व्यक्तिरेखांचे कपडे मळलेले दाखवायचे असतील तर इजींग म्हणजेच चहाचे पाणी किंवा अंबर पावडरचा वापर केला जातो. जीर्ण कपड्यांसाठी कलाकारांना ते घालायला लावून अंगावर मार्किंग करून नंतर दगडाने ठेचून किंवा मातीत लोळवून, फाडून मग धुतले जातात. ठिगळ लावतानाही हीच प्रोसेस होते. स्त्री व्यक्तिरेखांसाठी साडीचा पदर डोक्यावर, खांद्यावर, खोचलेला की पिन-अप केलेला यावर बऱ्याच गोष्टी ठरतात. कॅास्च्युममध्ये फुटवेअरही महत्त्वाचे असते. कॅरेक्टरनुसार चप्पल किंवा बूट दिले जातात. बॅाससाठी चकचकीत आणि सर्वसामान्यांसाठी अनपॅालिश बूट, गावाकडच्या व्यक्तिरेखेसाठी मळलेली आणि गरीबाला तुटलेली चप्पल दिली जाते. फुटवेअर्सवरून कॅरेक्टरची परिस्थिती अधोरेखित होते. दागिन्यांचा समावेशही व्यक्तिरेखेच्या परिस्थितीवर ठरतो. यशराजसारख्या मोठ्या बॅनर्सच्या सिनेमांमध्ये चकचकीतपणा आणण्यासाठी बऱ्याचदा लॅाजिक बाजूला ठेवले जाते. यासाठी महागड्या साड्या आणि ज्वेलरीचा वापर होतो. याउलट एखाद्या गावातील चित्रपटासाठी नवीन मंगळसूत्र, बांगड्या, कानातले घेऊन त्याचे पॅालिश काढले जाते.
मुंबईपासून सूरतपर्यंत पसरलेले मार्केट...
कॅास्च्युमध्ये काय खरेदी करायचे यावर कुठल्या मार्केटमध्ये जायचे ते ठरते. फॅशनेबल कपड्यांसाठी अंधेरीतील लोखंडवाला मार्केट आहे. याशिवाय बांद्र्यातील लिंकींग रोडवरील मार्केटमध्येही शोधाशोध केली जाते. सिनेमाचे बजेट कमी असूनही फॅन्सी ड्रेसेस दाखवायचे असतील, तर फॅशन स्ट्रीट फायदेशीर ठरते. टिपिकल मराठी कपड्यांसाठी दादरचे मिनी मार्केट आहे. तिथे सर्व काही मिळते. यात खादी ग्रामोद्योग भांडारपासून इतर कपड्यांच्या दुकानांमध्ये खरेदी केली जाते. जुन्या काळातील कपडे बऱ्याचदा शिवून घेतले जातात. कपडे तयार करण्यासाठी क्रॅाफर्ड मार्केट, गांधी मार्केट, हिंदमाता मार्केटमधून मटेरियल विकत घेतले जाते. जास्त हेव्ही मटेरिअल हवे असेल तर थेट गुजरातमधील सूरतही गाठले जाते. डान्ससाठी उपलब्ध असलेल्या कपड्यांवर काम चालवायचे की तयार करून घ्यायचे हे डिझाईनरवर अवलंबून असते. बरचशे डिझाईनर्सचे आपल्या पर्सनल टेलर्सना डिझाईन करून देतात. त्यानुसार टेलर्स आर्टिस्टच्या मेजरनुसार कपडे शिवतात. कपडे शिवल्यावर ट्रायल घेऊन मग फायनल टच दिला जातो.
तयार कॅास्च्युम्स ५०० रुपयांपासून पुढे...
डॅाक्टर, पोलीस, नर्स, शिपाई अशा कॅामन कॅरेक्टर्सचे कपडे भाड्याने मिळतात, पण ते कपडे किती दिवसांसाठी हवे याचाही विचार केला जातो. जर कपडे जास्त दिवसांसाठी हवे असतील, तर भाड्याच्याच पैशांमध्ये नवीन कपडे शिवून मिळतात. कपड्यांचे भाडे कोणते कपडे घेतले जातात यावर अवलंबून असते आणि ते आठवड्याचे असते. ड्रेससोबत इतर कोणकोणत्या अॅक्सेसरीज घेतल्या जातात यावरही भाडे ठरते. हा आकडा ५०० रुपयांपासून ५००० रुपयांपेक्षाही जास्त असतो. एखादा चित्रपट एका शेड्यूलमध्ये शूट होणार असेल, तर कॅास्च्युम भाड्याने घेणे परवडते, पण दोन शेड्यूलमध्ये अंतर असल्यास प्रॅाब्लेम होऊ शकतो. दुसऱ्या शेड्यूलवेळी तेच कपडे मिळतील याची खात्री नसल्याने कंटीन्यूटीचा इश्यू उद्भवू शकतो.
कोट्यवधींची उलाढाल
एखाद्या सिनेमात प्रत्येक कॅरेक्टरमध्ये किती बदल आहेत त्यावर कॅास्च्युम्सचे आर्थिक गणित अवलंबून असते. सिनेमाच्या बजेटवर कॅास्च्युमचे बजेट ठरते. त्यानुसार काम केले जाते. कमी बजेट असेल तर बऱ्याचदा तेच कपडे आलटून-पालटून वापरले जातात. त्यामुळे प्रत्येक सिनेमाचे कॉस्च्युमचे बजेट वेगवेगळे असते. हा आकडा १० हजार रुपयांपासून कित्येक लाखांमध्ये असतो. जेव्हा प्रोडक्शन हाऊसचे बजेट नसते, तेव्हा कलाकारांना स्वत:चेच काही कॅामन ब्रँडेड कपडे वापरावे लागतात. हिंदीसह मराठी सिनेसृष्टीत वर्षभरात कॅास्च्युममध्ये अंदाजे ४० ते ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल होते.
घ्यावी लागते हि काळजी...
नाटक, सिनेमा, मालिका आणि जाहिरातींसाठी एकाच ठिकाणी कपडे घेतले जातात. कॅमेऱ्यामध्ये कपड्यांची क्वालिटी लगेच समजत असल्याने फार तडजोड करता येत नाही. याउलट नाटकाला येणारे रसिक दूर बसत असल्याने स्वस्त कपडे वापरले तरी चालतात, पण ते रसिकांना समजणार नाही याची काळजी घ्यावी लागते. नाटकाचे खूप शोज होत असल्याने कपडे सारखे धुवावे लागतात. त्यावेळी त्यांचा दर्जा कमी कामा नये हे देखील पहावे लागते. अशा वेळी ब्रँडेड कपडेच परवडतात. नाटकाचे बजेट चांगले असेल तर एकाच कॅास्च्युमचे तीन सेट्सही बनवले जातात.
कॅास्च्युमसाठी दारोदारी फिरावे लागते...
ग्रामीण भागांतील किंवा इतर राज्यांमधील स्टोरी असेल तर त्या ठिकाणी जाऊन तिथल्या प्रत्यक्ष राहणीमानाचा रिसर्च करून कॅास्च्युम्स बनवले जातात. जर एखाद्या वेळी जुनेच कपडे वापरायचे असतील, तर स्थानिकांच्या दारोदारी फिरून जुने कपडे घेऊन त्याबदल्यात नवीन कपडे किंवा पैसे दिले जातात. त्यामुळे व्यक्तिरेखेतील नैसर्गिकपणा कायम राहतो. नवीन घेऊन पुन्हा जुने करण्यासाठी मेहनत व पैसे वाया घालवले जात नाहीत.
पाच लाखांपेक्षा अधिक बजेट...
कॅास्च्युमसाठी किती बजेट असावे हे निर्मिती संस्था ठरवते. त्यामुळे बऱ्याच कॅास्च्युम डिझाइनर्स फिक्स बजेट नसते. कारण त्यांच्या टिममध्ये असिस्टंट्स, ड्रेसमन्स, टेलर्स, फेटे बांधणारे, साडी नेसवणारेही असतात. याखेरीज शूटिंग किती दिवसांचे आहे यावरही डिझाइनर बजेट ठरते. यातही डिझाइनरचे काम फक्त लुक ठरवण्यापुरते आहे की पूर्ण सिनेमाभर शूटिंगसाठी आहे यावरही आर्थिक गणित आधारलेले असते. मराठीमध्ये सध्या तीन लाख रुपयांपासून पाच लाख रुपयांपेक्षाही अधिक डिझाइनरचे बजेट आहे. त्यांच्या सहकाऱ्यांना १००० रुपयांपासून २५०० रुपयांपर्यंत प्रतिदिन द्यावे लागतात. हि रक्कमही सिनेमा मराठी की हिंदी यावर ठरते.
तोपर्यंत ठेवले जातात कॅास्च्युम...
सिनेमा जोपर्यंत रिलीज होत नाही किंवा सेन्सॅार सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत कपडे स्टोअर केले जातात. रिशूट करण्याची वेळ आली आणि पॅचवर्क करावे लागले तर कपडे वापरता येतात. काही निर्माते कलाकारांनाच कपडे देतात, पण काहीजण विकतात. सिरीयल्समधील कपडे इकडून तिकडे फिरत असतात. जाहिरात करणाऱ्या एजन्सीजनाही कपडे विकले जातात. पूर्वी फेमस स्टुडिओमध्ये कपड्यांचे प्रदर्शन भरवले जायचे. त्याद्वारे कमी दरात सर्वसामान्यांना कपडे मिळायचे.
.............................
- चैत्राली डोंगरे (कॅास्च्युम डिझाइनर)
पूर्वी आर्टिस्टचेच कॅास्च्युम सिनेमातही वापरले जायचे, पण आता काळ बदलला आहे. आज प्रोडक्शन हाऊसच कॅास्च्युम्स देतं. कलाकार जे कपडे सिनेमात वापरतात त्याद्वारे सिनेमाचं प्रमोशनही केलं जाऊ शकतं असं मला वाटतं. सिनेमाच्या रिलीजवेळी निर्मात्यांनी कॅास्च्युम्स विकायला काढावेत. त्यामुळे फ्रेश ट्रेंडमधील कपडे थेट लोकांपर्यंत पोहोचतील आणि कलाकारांनी परिधान केलेले कपडे मिळाल्याचं समाधान रसिकांना मिळेल. ज्यामुळे आपोआपच चित्रपटाचंही प्रमोशन होईल. याहीपेक्षा ज्या आर्टिस्टनं सिनेमात कपडे घातले त्यानंच जर लकी ड्रॅाच्या माध्यमातून विजेता निवडून रसिकांना विनामूल्य कपडे दिले तर ते प्रमोशनच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरेल.
................................
- दीपक शाह (मालक - अशोक स्टोर, दादर)
मागील ७० वर्षांपासून आम्ही सर्वसामान्यांसोबतच मालिका, चित्रपट आणि नाटकांमधील कॅरेक्टर्सच्या कॅास्च्युम डिझाईनिंगसाठी कच्चा माल पुरवत आहोत. साड्यांसोबतच ड्रेस मटेयिरल, ब्लाऊज आणि कुर्त्यांसाठीही फॅन्सी तसंच फॅशनेबल मटेरियल पुरवतो. आज जवळपास १५ ते २० कॅास्च्युम डिझाईनर्स आमच्या संपर्कात आहेत. क्वालिटीला प्राधान्य देत असून, दरही वाजवी असल्यानं ते अन्यत्र कुठेही जात नाहीत. कॅास्च्युम डिझाईनर्सपासून सर्वसामान्य गिऱ्हाईकांच्या माध्यमातून दरमहा १५ ते २० लाख रुपयांची उलाढाल होते. कॅास्च्युम डिझाईनर्सच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही मटेरियल सुचवतो. त्यांना हवं असलेलं मटेरिअल उपलब्ध नसेल तर मागवूनही देतो. साड्यांमध्ये नवनवीन ट्रेंड सुरूच असतात, पण फॅन्सी मटेरिअल्सची खूप मागणी आहे.मनोरंजन विश्वात महत्त्वाचे असणाऱ्या कपडेपट म्हणजेच कॉस्च्युमची रंगीबेरंगी दुनिया खूप मोठी आहे. मागणीनुसार पुरवठा करणाऱ्या या मार्केटमध्ये वर्षाकाठी ४० ते ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल होते. मुंबईतील विविध भागांमध्ये पसरलेल्या कॅासच्युमच्या मार्केटची व्याप्ती थेट गुजरातमधील सूरतपर्यंत पसरलेली आहे. कॅास्च्युम्सच्या या दुनियेचा कारभार नक्की चालतो तरी कसा आणि एखादी कलाकृती तयार झाल्यानंतर कलाकारांनी वापरलेल्या कॅास्च्युम्सचं होते तरी काय असे बरेच प्रश्न सर्वसामान्य प्रेक्षकांना नेहमी पडतात.
कोणत्याही कलाकृतीमधील कलाकारांसाठी कपडे तयार करण्यापूर्वी कॅास्च्युम डिझाइनरला सर्वप्रथम डायलॅाग्जसह स्टोरी ऐकवली जाते. दिग्दर्शकासोबत चर्चा करून स्टोरीचा काळ जाणून घेतला जातो. त्यावर फॅशन ट्रेंड ठरवला जातो. गोष्ट कुठे घडते, हे पाहिले जाते. स्टोरी किती दिवसांमध्ये पूर्ण होणार हे देखील महत्त्वाचे असते. कारण कंटीन्यूटी हा फॅक्टर चित्रपटांमध्ये गरजेचा असतो. सायकॅालॅाजीकल, साशॅलॉजिकल, इन्व्हायरमेंटल कंडीशन्सचाही विचार केला जातो. कॅरेक्टरचे इन्कम आणि पार्श्वभूमीवरही कॅास्च्युम ठरते. गरीब-श्रीमंत, आधुनिक-ऐतिहासिक, पौराणिक-मध्यमयुगीन, शहरी-ग्रामीण अशा विविध वर्गवारीमध्ये कॅास्च्युम्स विभागले जातात.
कॅरेक्टर्ससाठी काही कपडे तयार मिळतात, पण बरेचसे ट्रेंडनुसार किंवा गरजेनुसार तयार केले जातात. लग्नात किंवा एखाद्या कार्यक्रमात नवीन कपडे चातले जातात, पण घरगुती सीन्ससाठी नवीन कपडे घेऊन धुवावे लागतात. गावाकडच्या व्यक्तिरेखांचे कपडे मळलेले दाखवायचे असतील तर इजींग म्हणजेच चहाचे पाणी किंवा अंबर पावडरचा वापर केला जातो. जीर्ण कपड्यांसाठी कलाकारांना ते घालायला लावून अंगावर मार्किंग करून नंतर दगडाने ठेचून किंवा मातीत लोळवून, फाडून मग धुतले जातात. ठिगळ लावतानाही हीच प्रोसेस होते. स्त्री व्यक्तिरेखांसाठी साडीचा पदर डोक्यावर, खांद्यावर, खोचलेला की पिन-अप केलेला यावर बऱ्याच गोष्टी ठरतात. कॅास्च्युममध्ये फुटवेअरही महत्त्वाचे असते. कॅरेक्टरनुसार चप्पल किंवा बूट दिले जातात. बॅाससाठी चकचकीत आणि सर्वसामान्यांसाठी अनपॅालिश बूट, गावाकडच्या व्यक्तिरेखेसाठी मळलेली आणि गरीबाला तुटलेली चप्पल दिली जाते. फुटवेअर्सवरून कॅरेक्टरची परिस्थिती अधोरेखित होते. दागिन्यांचा समावेशही व्यक्तिरेखेच्या परिस्थितीवर ठरतो. यशराजसारख्या मोठ्या बॅनर्सच्या सिनेमांमध्ये चकचकीतपणा आणण्यासाठी बऱ्याचदा लॅाजिक बाजूला ठेवले जाते. यासाठी महागड्या साड्या आणि ज्वेलरीचा वापर होतो. याउलट एखाद्या गावातील चित्रपटासाठी नवीन मंगळसूत्र, बांगड्या, कानातले घेऊन त्याचे पॅालिश काढले जाते.
मुंबईपासून सूरतपर्यंत पसरलेले मार्केट...
कॅास्च्युमध्ये काय खरेदी करायचे यावर कुठल्या मार्केटमध्ये जायचे ते ठरते. फॅशनेबल कपड्यांसाठी अंधेरीतील लोखंडवाला मार्केट आहे. याशिवाय बांद्र्यातील लिंकींग रोडवरील मार्केटमध्येही शोधाशोध केली जाते. सिनेमाचे बजेट कमी असूनही फॅन्सी ड्रेसेस दाखवायचे असतील, तर फॅशन स्ट्रीट फायदेशीर ठरते. टिपिकल मराठी कपड्यांसाठी दादरचे मिनी मार्केट आहे. तिथे सर्व काही मिळते. यात खादी ग्रामोद्योग भांडारपासून इतर कपड्यांच्या दुकानांमध्ये खरेदी केली जाते. जुन्या काळातील कपडे बऱ्याचदा शिवून घेतले जातात. कपडे तयार करण्यासाठी क्रॅाफर्ड मार्केट, गांधी मार्केट, हिंदमाता मार्केटमधून मटेरियल विकत घेतले जाते. जास्त हेव्ही मटेरिअल हवे असेल तर थेट गुजरातमधील सूरतही गाठले जाते. डान्ससाठी उपलब्ध असलेल्या कपड्यांवर काम चालवायचे की तयार करून घ्यायचे हे डिझाईनरवर अवलंबून असते. बरचशे डिझाईनर्सचे आपल्या पर्सनल टेलर्सना डिझाईन करून देतात. त्यानुसार टेलर्स आर्टिस्टच्या मेजरनुसार कपडे शिवतात. कपडे शिवल्यावर ट्रायल घेऊन मग फायनल टच दिला जातो.
तयार कॅास्च्युम्स ५०० रुपयांपासून पुढे...
डॅाक्टर, पोलीस, नर्स, शिपाई अशा कॅामन कॅरेक्टर्सचे कपडे भाड्याने मिळतात, पण ते कपडे किती दिवसांसाठी हवे याचाही विचार केला जातो. जर कपडे जास्त दिवसांसाठी हवे असतील, तर भाड्याच्याच पैशांमध्ये नवीन कपडे शिवून मिळतात. कपड्यांचे भाडे कोणते कपडे घेतले जातात यावर अवलंबून असते आणि ते आठवड्याचे असते. ड्रेससोबत इतर कोणकोणत्या अॅक्सेसरीज घेतल्या जातात यावरही भाडे ठरते. हा आकडा ५०० रुपयांपासून ५००० रुपयांपेक्षाही जास्त असतो. एखादा चित्रपट एका शेड्यूलमध्ये शूट होणार असेल, तर कॅास्च्युम भाड्याने घेणे परवडते, पण दोन शेड्यूलमध्ये अंतर असल्यास प्रॅाब्लेम होऊ शकतो. दुसऱ्या शेड्यूलवेळी तेच कपडे मिळतील याची खात्री नसल्याने कंटीन्यूटीचा इश्यू उद्भवू शकतो.
कोट्यवधींची उलाढाल
एखाद्या सिनेमात प्रत्येक कॅरेक्टरमध्ये किती बदल आहेत त्यावर कॅास्च्युम्सचे आर्थिक गणित अवलंबून असते. सिनेमाच्या बजेटवर कॅास्च्युमचे बजेट ठरते. त्यानुसार काम केले जाते. कमी बजेट असेल तर बऱ्याचदा तेच कपडे आलटून-पालटून वापरले जातात. त्यामुळे प्रत्येक सिनेमाचे कॉस्च्युमचे बजेट वेगवेगळे असते. हा आकडा १० हजार रुपयांपासून कित्येक लाखांमध्ये असतो. जेव्हा प्रोडक्शन हाऊसचे बजेट नसते, तेव्हा कलाकारांना स्वत:चेच काही कॅामन ब्रँडेड कपडे वापरावे लागतात. हिंदीसह मराठी सिनेसृष्टीत वर्षभरात कॅास्च्युममध्ये अंदाजे ४० ते ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल होते.
घ्यावी लागते हि काळजी...
नाटक, सिनेमा, मालिका आणि जाहिरातींसाठी एकाच ठिकाणी कपडे घेतले जातात. कॅमेऱ्यामध्ये कपड्यांची क्वालिटी लगेच समजत असल्याने फार तडजोड करता येत नाही. याउलट नाटकाला येणारे रसिक दूर बसत असल्याने स्वस्त कपडे वापरले तरी चालतात, पण ते रसिकांना समजणार नाही याची काळजी घ्यावी लागते. नाटकाचे खूप शोज होत असल्याने कपडे सारखे धुवावे लागतात. त्यावेळी त्यांचा दर्जा कमी कामा नये हे देखील पहावे लागते. अशा वेळी ब्रँडेड कपडेच परवडतात. नाटकाचे बजेट चांगले असेल तर एकाच कॅास्च्युमचे तीन सेट्सही बनवले जातात.
कॅास्च्युमसाठी दारोदारी फिरावे लागते...
ग्रामीण भागांतील किंवा इतर राज्यांमधील स्टोरी असेल तर त्या ठिकाणी जाऊन तिथल्या प्रत्यक्ष राहणीमानाचा रिसर्च करून कॅास्च्युम्स बनवले जातात. जर एखाद्या वेळी जुनेच कपडे वापरायचे असतील, तर स्थानिकांच्या दारोदारी फिरून जुने कपडे घेऊन त्याबदल्यात नवीन कपडे किंवा पैसे दिले जातात. त्यामुळे व्यक्तिरेखेतील नैसर्गिकपणा कायम राहतो. नवीन घेऊन पुन्हा जुने करण्यासाठी मेहनत व पैसे वाया घालवले जात नाहीत.
पाच लाखांपेक्षा अधिक बजेट...
कॅास्च्युमसाठी किती बजेट असावे हे निर्मिती संस्था ठरवते. त्यामुळे बऱ्याच कॅास्च्युम डिझाइनर्स फिक्स बजेट नसते. कारण त्यांच्या टिममध्ये असिस्टंट्स, ड्रेसमन्स, टेलर्स, फेटे बांधणारे, साडी नेसवणारेही असतात. याखेरीज शूटिंग किती दिवसांचे आहे यावरही डिझाइनर बजेट ठरते. यातही डिझाइनरचे काम फक्त लुक ठरवण्यापुरते आहे की पूर्ण सिनेमाभर शूटिंगसाठी आहे यावरही आर्थिक गणित आधारलेले असते. मराठीमध्ये सध्या तीन लाख रुपयांपासून पाच लाख रुपयांपेक्षाही अधिक डिझाइनरचे बजेट आहे. त्यांच्या सहकाऱ्यांना १००० रुपयांपासून २५०० रुपयांपर्यंत प्रतिदिन द्यावे लागतात. हि रक्कमही सिनेमा मराठी की हिंदी यावर ठरते.
तोपर्यंत ठेवले जातात कॅास्च्युम...
सिनेमा जोपर्यंत रिलीज होत नाही किंवा सेन्सॅार सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत कपडे स्टोअर केले जातात. रिशूट करण्याची वेळ आली आणि पॅचवर्क करावे लागले तर कपडे वापरता येतात. काही निर्माते कलाकारांनाच कपडे देतात, पण काहीजण विकतात. सिरीयल्समधील कपडे इकडून तिकडे फिरत असतात. जाहिरात करणाऱ्या एजन्सीजनाही कपडे विकले जातात. पूर्वी फेमस स्टुडिओमध्ये कपड्यांचे प्रदर्शन भरवले जायचे. त्याद्वारे कमी दरात सर्वसामान्यांना कपडे मिळायचे.
.............................
- चैत्राली डोंगरे (कॅास्च्युम डिझाइनर)
पूर्वी आर्टिस्टचेच कॅास्च्युम सिनेमातही वापरले जायचे, पण आता काळ बदलला आहे. आज प्रोडक्शन हाऊसच कॅास्च्युम्स देतं. कलाकार जे कपडे सिनेमात वापरतात त्याद्वारे सिनेमाचं प्रमोशनही केलं जाऊ शकतं असं मला वाटतं. सिनेमाच्या रिलीजवेळी निर्मात्यांनी कॅास्च्युम्स विकायला काढावेत. त्यामुळे फ्रेश ट्रेंडमधील कपडे थेट लोकांपर्यंत पोहोचतील आणि कलाकारांनी परिधान केलेले कपडे मिळाल्याचं समाधान रसिकांना मिळेल. ज्यामुळे आपोआपच चित्रपटाचंही प्रमोशन होईल. याहीपेक्षा ज्या आर्टिस्टनं सिनेमात कपडे घातले त्यानंच जर लकी ड्रॅाच्या माध्यमातून विजेता निवडून रसिकांना विनामूल्य कपडे दिले तर ते प्रमोशनच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरेल.
................................
- दीपक शाह (मालक - अशोक स्टोर, दादर)
मागील ७० वर्षांपासून आम्ही सर्वसामान्यांसोबतच मालिका, चित्रपट आणि नाटकांमधील कॅरेक्टर्सच्या कॅास्च्युम डिझाईनिंगसाठी कच्चा माल पुरवत आहोत. साड्यांसोबतच ड्रेस मटेयिरल, ब्लाऊज आणि कुर्त्यांसाठीही फॅन्सी तसंच फॅशनेबल मटेरियल पुरवतो. आज जवळपास १५ ते २० कॅास्च्युम डिझाईनर्स आमच्या संपर्कात आहेत. क्वालिटीला प्राधान्य देत असून, दरही वाजवी असल्यानं ते अन्यत्र कुठेही जात नाहीत. कॅास्च्युम डिझाईनर्सपासून सर्वसामान्य गिऱ्हाईकांच्या माध्यमातून दरमहा १५ ते २० लाख रुपयांची उलाढाल होते. कॅास्च्युम डिझाईनर्सच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही मटेरियल सुचवतो. त्यांना हवं असलेलं मटेरिअल उपलब्ध नसेल तर मागवूनही देतो. साड्यांमध्ये नवनवीन ट्रेंड सुरूच असतात, पण फॅन्सी मटेरिअल्सची खूप मागणी आहे.