"४४४४... हा आकडा सोपा नाही", केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 01:10 PM2024-08-15T13:10:10+5:302024-08-15T13:11:07+5:30

Punha Sahi Re Sahi : केदार शिंदे, भरत जाधव आणि अंकुश चौधरी यांचं गाजलेलं नाटक सही रे सहीचा ४४४४वा प्रयोग पार पडणार आहे. यानिमित्ताने केदार शिंदेंनी खास पोस्ट शेअर केली आहे.

"4444... This number is not easy", Kedar Shinde's post in discussion | "४४४४... हा आकडा सोपा नाही", केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत

"४४४४... हा आकडा सोपा नाही", केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून केदार शिंदे (Kedar Shinde) यांच्याकडे पाहिले जाते. केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेले अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झालेत. मागील वर्षी २०२३ला रिलीज झालेला 'बाईपण भारी देवा' चित्रपट चांगलाच यशस्वी झाला. 'सैराट'नंतर सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट म्हणून 'बाईपण भारी देवा' चित्रपट ओळखला जातो. केदार शिंदे, भरत जाधव आणि अंकुश चौधरी यांचं गाजलेलं नाटक सही रे सहीचा ४४४४वा प्रयोग पार पडणार आहे. यानिमित्ताने केदार शिंदेंनी खास पोस्ट शेअर केली आहे.

केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर पुन्हा सही रे सही नाटकाचा पोस्टर शेअर करत लिहिले की, ४४४४... हा आकडा सोपा नाही. गेली २२ वर्षे "सही" तुम्हा रसिकांच्या मनात राज्य करतंय. ही स्वामींची कृपा. तुमचं प्रेम. भरत आणि टिमची मेहनत... आमच्या त्रिकुटाने आमच्या मैत्रीची खात्री म्हणून "सही" केली. जोवर मराठी रंगभूमी आहे तोवर ही सही पुसणं शक्य नाही.


मराठी रंगभूमीवर 'सही रे सही' या नाटकाने लोकप्रियतेचे उच्चांक गाठला होता. या नाटकातील तीन मित्रांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती. नाट्यप्रेमींच्या मनावर आपली छाप पाडणऱ्या 'सही रे सही' या नाटकाचा पहिला प्रयोग १५ ऑगस्ट २००२ मध्ये झाला होता. 

वर्कफ्रंट 
केदार शिंदेंनी २०२३ मध्ये आलेला 'बाईपण भारी देवा' या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाचे सर्वच स्तरांवर कौतुक झाले. काही दिवसांपूर्वी केदार शिंदे यांनी 'आईपण भारी देवा' या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली. २०२५ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. केदार शिंदे सध्या कलर्स मराठी टिव्हीचे प्रोग्रामिंग हेड म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

Web Title: "4444... This number is not easy", Kedar Shinde's post in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.