५६ वा राज्य मराठी चित्रपट महोत्सवात तांत्रिक गटात या चित्रपटांनी मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 07:08 PM2019-04-12T19:08:18+5:302019-04-12T19:10:12+5:30

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण ६६ मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका ५६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या.

56 Maharashtra State Film Awards | ५६ वा राज्य मराठी चित्रपट महोत्सवात तांत्रिक गटात या चित्रपटांनी मारली बाजी

५६ वा राज्य मराठी चित्रपट महोत्सवात तांत्रिक गटात या चित्रपटांनी मारली बाजी

googlenewsNext
ठळक मुद्देअंतिम फेरीसाठी दिठी, भोंगा, डॉ. काशिनाथघाणेकर, फायरब्रँड, बंदीशाळा, आम्ही दोघी, एक सांगायचंय, अनसेड हार्मोनी, तेंडल्या, भूर्जी, चुंबक या दहा चित्रपटांचे उत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले

५६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन नामांकनांची शिफारस तसेच सात तांत्रिक पुरस्कार आणि बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके नुकतीच घोषित करण्यात आली आहेत. अंतिम फेरीसाठी दिठी, भोंगा, डॉ. काशिनाथघाणेकर, फायरब्रँड, बंदीशाळा, आम्ही दोघी, एक सांगायचंय, अनसेड हार्मोनी, तेंडल्या, भूर्जी, चुंबक या दहा चित्रपटांचे उत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले आहे तर घोषित पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी नरेंद्र हळदणकर (बंदीशाळा), उत्कृष्ट छायालेखनासाठी सुधीर पळसाने (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), उत्कृष्ट संकलनासाठी नचिकेत वाईकर (तेंडल्या), उत्कृष्ट ध्वनीमुद्रणासाठी गंधार मोकाशी (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), उत्कृष्ट ध्वनी संयोजनासाठी मंदार कमलापूरकर (पुष्पक विमान), उत्कृष्ट वेशभूषासाठी चैत्राली गुप्ते (एक सांगायचय अनसेड हार्मोनी), उत्कृष्ट रंगभूषासाठी विक्रम गायकवाड (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), उत्कृष्ट बालकलाकारासाठी श्रीनिवास पोकळे (नाळ) आणि अमन कांबळे (तेंडल्या) यांना पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण ६६ मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका ५६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. त्या सर्व चित्रपटांचे प्राथमिक फेरीच्या १४ तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून परीक्षण करण्यात आले.

घोषित पुरस्कारांव्यतिरिक्त नामांकन लाभलेल्या पुरस्कारासाठी अंतिम फेरीच्या तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून संबंधित चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून हे पुरस्कार २६ मे २०१९ रोजी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतील.

पुरस्कारात यांनी मारली बाजी
उत्कृष्ट कला दिग्दर्शन
कै.साहेबमामा ऊर्फ फत्तेलाल पारितोषिक रु.50 हजार आणि मानचिन्ह
नरेंद्र हळदणकर
बंदीशाळा

उत्कृष्ट छायालेखन
कै. पांडूरंग नाईक पारितोषिक रु. 50 हजार आणि मानचिन्ह
सुधीर पळसाने
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर

उत्कृष्ट संकलन
रु. 50 हजार आणि मानचिन्ह
नचिकेत वाईकर
तेंडल्या

उत्कृष्ट ध्वनीमुद्रण
रु. 50 हजार आणि मानचिन्ह
गंधार मोकाशी
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर

उत्कृष्ट ध्वनी संयोजन
रु. 50 हजार आणि मानचिन्ह
मंदार कमलापूरकर
पुष्पक विमान

उत्कृष्ट वेशभूषा
रु. 50 हजार आणि मानचिन्ह
चैत्राली गुप्ते
एक सांगायचंय-अनसेड हार्मोनी

उत्कृष्ट रंगभूषा
रु. 50 हजार आणि मानचिन्ह
विक्रम गायकवाड
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर

उत्कृष्ट बालकलाकार
कै. गजानन जहागिरदार पुरस्कार रु. 50 हजार आणि मानचिन्ह
श्रीनिवास पोकळे
नाळ
आणि अमन कांबळे
तेंडल्या
 
या चित्रपटांना मिळाले नामांकनं
सर्वोत्कृष्ट कथा
कै.मधुसूदन कालेलकर पारितोषिक रु.50 हजार आणि मानचिन्ह
शिवाजी लोटन पाटील
भोंगा

सुधाकर रेड्डी यंकट्टी
नाळ

अरुणा राजे
फायरब्रँड

उत्कृष्ट पटकथा
पारितोषिक रु.50 हजार आणि मानचिन्ह
सुमित्रा भावे
दिठी

शिवाजी लोटन पाटील
निशांत धापसे
भोंगा

अभिजीत शिरीष देशपांडे
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर

उत्कृष्ट संवाद
कै.आचार्य अत्रे पारितोषिक रु.50 हजार आणि मानचिन्ह
विवेक बेळे
आपला माणूस

अभिजित शिरीष देशपांडे
गुरु ठाकूर
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर

अरुणा राजे
फायरब्रँड

उत्कृष्ट गीते
कै.माडगुळकर पारितोषिक रु.50 हजार आणि मानचिन्ह
संजय कृष्णाजी पाटील
गीत-काळोखाच्या वाटेवर उजेड रुसला बाई
बंदीशाळा

सुनील सुखटणकर
गीत-राधे राधे
वेलकम होम

सायली खरे
गीत- दिस येती दिस जाती
न्यूड

उत्कृष्ट संगीत
कै.अरुण पौडवाल पारितोषिक 50 हजार आणि मानचिन्ह
राजेश सरकाटे
मेनका उर्वशी

शैलेंद्र बर्वे
एक सांगायचय अनसेड हार्मोनी

नरेंद्र भिडे
संतोष मुळेकर
पुष्पक विमान

उत्कृष्ट पार्श्वसंगीत
रु.50 हजार आणि मानचिन्ह
संतोष मुळेकर
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर

विजय नारायण गवंडे
बंदीशाळा

पियूष कनोजिया
सविता दामोदर परांजपे

उत्कृष्ट पार्श्वगायक
रु.50 हजार आणि मानचिन्ह
आदर्श शिंदे
गीत - या जगी नसेन मी
सोपस्कार

हृषिकेश रानडे
गीत- तुझ्या आठवणीचे
व्हॉटस अप लग्न

स्वप्निल बांदोडकर
गीत-मला सॉरी म्हणायचंय
माधुरी

उत्कृष्ट पार्श्वगायिका
रु.50 हजार आणि मानचिन्ह
निहीरा जोशी देशपांडे
गीत-फुंकरीची वादळे
व्हॉटस अप लग्न

प्रियांका बर्वे
गीत-दीशा पेटल्या दाही
बंदीशाळा

वैशाली सामंत
गीत-तुम्ही येताना केला इशारा
फर्जंद

उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक
रु.50 हजार आणि मानचिन्ह
दिपाली विचारे
पुष्पक विमान

उमेश जाधव
मेनका उर्वशी

फलवा खामकर    
व्हॉटस अप लग्न

उत्कृष्ट  अभिनेता
कै.शाहू मोडक पारितोषिक रु.50 हजार आणि मानचिन्ह
श्री शिवाजी गणेशन पुरस्कार
के.के.मेमन
एक सांगायचय अनसेड हार्मोनी

किशोर कदम
दिठी

सुबोध भावे
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर

उत्कष्ट अभिनेत्री
कै.स्मिता पाटील पारितोषिक रु.50 हजार आणि मानचिन्ह
मुक्ता बर्वे
बंदीशाळा

देविका दप्तरदार
नाळ

कल्याणी मुळे
न्यूड

सहाय्यक अभिनेता
कै.चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक रु.50 हजार आणि मानचिन्ह
सुमित राघवन
आपला माणूस

स्वानंद किरकिरे
चुंबक

सचिन खेडेकर
फायरब्रँड

सहाय्यक अभिनेत्री
कै.शांता हुबळीकर आणि कै.हंसा वाडकर पारितोषिक रु.50हजार आणि मानचिन्ह
राजेश्वरी सचदेव
फायरब्रँड

नंदीता धुरी
आणि डॉ.काशिनाथ घाणेकर

छाया कदम
न्यूड

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता
कै. काशिनाथ घाणेकर पारितोषिक रु.50 हजार आणि मानचिन्ह
आशिष गिरमे
भूर्जी

फिरोज शेख

Web Title: 56 Maharashtra State Film Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.