​‘सैराट’च्या पायरसी प्रकरणी ६ जणांना अटक, ६ हजार सीडी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2016 05:05 PM2016-05-06T17:05:33+5:302016-05-06T22:35:33+5:30

बॉक्स आॅफिसवर सुसाट धावणाºया ‘सैराट’ चित्रपटाच्या पायरसी प्रकरणी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पोलिसात धाव घेतली होती. त्यानंतर पोलिसांनीही झाडाझडती ...

6 people arrested in 'Pirate' piracy case, 6000 CDs seized | ​‘सैराट’च्या पायरसी प्रकरणी ६ जणांना अटक, ६ हजार सीडी जप्त

​‘सैराट’च्या पायरसी प्रकरणी ६ जणांना अटक, ६ हजार सीडी जप्त

googlenewsNext
क्स आॅफिसवर सुसाट धावणाºया ‘सैराट’ चित्रपटाच्या पायरसी प्रकरणी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पोलिसात धाव घेतली होती. त्यानंतर पोलिसांनीही झाडाझडती सुरू केली होती. त्यात पोलिसांनी आणखी सहा जणांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून २३ सीडी, ३ संगणक व ६ हजार रिकाम्या सीडी जप्त करण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी पुण्यात पहिली अटक झाली होती. त्यानंतर काल मुंबईहून सहा जणांना अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी सुमारे ७ ठिकाणी धाडी टाकून कारवाई केली. 
पोलिसांनी पायरेट कॉपी बनविण्यासाठीचे सर्व साहित्य आरोपींकडून जप्त केले असून सैराटची कॉपी पायरेट करणाºया सुरेंद्र घोसाळकर (३४), हमीश खान (२१), शाहबाज खान (२२), मुश्ताक खान (२३), इबनेश शाह (३४) आणि अब्दुल शाह उर्फ बबलू (२२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपांची नावे आहेत.  

Web Title: 6 people arrested in 'Pirate' piracy case, 6000 CDs seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.