68th National Film Awards : राहुल देशपांडेंना पार्श्वगायनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 05:11 PM2022-07-22T17:11:05+5:302022-07-22T17:11:32+5:30
68th National Film Awards: मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत मनाचा समजला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज जाहीर करण्यात आला.
मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत मनाचा समजला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज जाहीर करण्यात आला. यंदाचा ६८ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ( 68th National Film Awards) सोहळा दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे पार पडत आहे. कलाकारांना त्यांच्या सर्वोत्कृष्ट कामासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती प्रेस इनफॉर्मेशन ब्युरोच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून देण्यात आली आहे. या पुरस्कारांसाठी दरवर्षी हिंदीसह, मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, छत्तीसगढ़ी, हरियाणवी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना नामांकने दिली जातात. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे(Rahul Deshpande)ला पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
राहूल देशपांडेला पार्श्वगायनासाठी यंंदाचा ६८ वा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. बेस्ट ज्युरी फिचर फिल्मसाठी 'जून' सिद्धार्थ मेनन सिनेमाची निर्मिती प्लॅनेट मराठीने केली आहे. 'अवांचित' आणि 'गोदकथा' या दोन मराठी सिनेमांसाठी किशोर कदम यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. नॉन फिचर्स फिल्ममध्ये कुंकूमार्चन या मराठी चित्रपटालाही पुरस्कार मिळाला आहे. चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात.